… तर भाजप सरकारविरुद्धही आंदोनल छेडा; विनोद तावडे यांचा अभाविप कार्यकर्त्यांना र्संदेश 

By वासुदेव.पागी | Published: July 9, 2023 07:01 PM2023-07-09T19:01:07+5:302023-07-09T19:01:24+5:30

आंदोलन करणे हे परिषदेचे कामच असल्याचे विनोद तावडेंनी सांगितले.

Andonal Cheda against BJP government too Vinod Tawde's message to ABVP workers | … तर भाजप सरकारविरुद्धही आंदोनल छेडा; विनोद तावडे यांचा अभाविप कार्यकर्त्यांना र्संदेश 

… तर भाजप सरकारविरुद्धही आंदोनल छेडा; विनोद तावडे यांचा अभाविप कार्यकर्त्यांना र्संदेश 

googlenewsNext

पणजी : भाजप सरकारच्या एखाद्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधातआंदोलन करायला कधीही कचरू नका, मग सरकार कुणाचेही असू दे, असा संदेश भाजपचे राष्ट्रीय महासचीव विनोद तावडे यांनी पणजीतअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परिषदेच्या ७५ व्यास्थापनादिनानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलताना केले. अन्यायालाविरुद्ध आवाज उठविणे, आंदोलन करणे हे परिषदेचे कामच असल्याचे त्यांनी सांगितले.

अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या अभाविपच्या कार्यक्रमास प्रमुखपाहुणे या नात्याने निमंत्रीत असलेले तावडे हे अभाविपचे माजीप्रदेशमंत्रीही आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले,  अभाविपचे काम हे कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि संघर्षातून उभे राहिलेआहे. गोव्यातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी परिषदेने अनेक आंदोलनेइतिहासात केली आहेत. आजही एखाद्या मुद्यावर आंदोलन करण्याचीगरज असेल तर ते परिषदेने करावेच. सत्तेत कोणते सरकार आहे किंवाकोण मंत्री आहे याचा विचार न करता अन्यायाविरुद्ध आंदोलन छेडा.  कुणाला काय वाटेल याची चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्हीएखाद्या व्यक्तीविरुद्ध नव्हे तर विशिष्ट पदाधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्धआंदोलन करीत आहेत. विद्यार्थी परिषदेचे काम हे आंदोलनांमुळेच वाढलेआहे असे तावडे यांनी सांगितले.

तावडे यांनी गोव्यातील विद्यार्थीपरिषदेच्या कामाचे कौतुक करतानाच तेप्रदेश महामंत्री असतानाच्या गोव्यातील कामांच्या आणि विशेषतःआंदोलनांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या आठवणी त्यांनी सांगितल्या. विद्यार्थी परिषदेच्या कामामुळेच तळागळातील लोकांचे जीवन जवळूनपाहण्याची संधी आपल्याला मिळाली आणि त्यामुळेच देशातआरक्षणाची किती गरज आहे हे आपल्याला त्यावेळी पटले असेही त्यांनीसांगितले.

या कार्यक्रमाला विद्यार्थी परिषदेचे अनेक माजी कार्यकर्तेही उपस्थितहोते. त्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार संकल्प आमोणकर, नरेंद्रसावईकर, दत्ता नाईक निलांगी शिंदे, अजितसिंग राणे, अँड प्रवीणफळदेसाई, माहिती आयुक्त विश्वास सतरकर, भूषण भावे व इतरकार्यकर्ते उपस्थित होते. विभाग संयोजक धनश्री मांद्रेकर, राष्ट्रीय महासचिव अंकिता पवार, विभाग प्रमुख विलास सतरकर, वैभव शहरमंत्री यांचीही यावेळी भाषणेझाली. 

भाजपचे डिपॉजिट जप्त होत होते तेव्हा…
गोव्यात विद्यार्थी परिषदेचे काम हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे उभे  राहिलेअसून कोणतेही सरकार किंवा पक्ष याचा त्यात काही संबंध नाही आहे.  जेव्हा गोव्यातील निवडणुकीत भाजप उमेदवारांची अनामत रक्कम जप्तहोत होती त्यावेळी गोवा विद्यापीठावर विद्यार्थी परीषदेचा झेंडा फडकतहोता असे प्रा. दत्ता नाईक यांनी यावेळी सांगितले. नरेंद्र सावईकर, निलांगीशिंदे व इतर माजी कार्यकर्त्यांनीही यावेळी परिषदेच्या मागीलआंदोलनांना उजाळा देणारे अनुभव कथन केले.
 

Web Title: Andonal Cheda against BJP government too Vinod Tawde's message to ABVP workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.