शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

प्रभाग आरक्षणाविरुद्ध न्यायालयात याचिका

By admin | Published: September 30, 2015 1:20 AM

मडगाव : पालिका निवडणुकीतील राखीवतेच्या मुद्द्याला आव्हान देत मडगावातील आघाडीच्या महिला कार्यकर्त्या आवदा व्हिएगस, तसेच फातोर्ड्यातील रवींद्र नाईक या

मडगाव : पालिका निवडणुकीतील राखीवतेच्या मुद्द्याला आव्हान देत मडगावातील आघाडीच्या महिला कार्यकर्त्या आवदा व्हिएगस, तसेच फातोर्ड्यातील रवींद्र नाईक या दोघांनी न्यायालयाची दारे ठोठावली आहेत. सरकारने जे राखीव प्रभाग जाहीर केले आहेत त्यामागे कुठलेही धोरण नाही, असा दोन्ही पक्षकारांनी दावा केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या या दोन रिट याचिकांद्वारे संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी केली आहे. पालिका निवडणूक आरक्षणात सरकारने मोठ्या प्रमाणावर घोळ घातला आहे. त्यामुळे संपूर्ण गोव्यात असंतोष पसरला असून या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी चालू आहे, अशा आशयाचे वृत्त शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. हे वृत्त मंगळवारी खरे ठरले. मंगळवारी सकाळी व्हिएगस यांच्याबरोबर अन्य एका महिला कार्यकर्त्याने दाखल केलेल्या रिट याचिकेत पाजीफोंड येथील प्रभाग ११च्या राखीवतेला आव्हान दिले आहे. हे आव्हान देताना घटनेच्या ७४ कलमाखाली महिलांना जे अधिकार दिले आहेत, त्या अधिकारांची पायमल्ली झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. ‘लोकमत’शी बोलताना व्हिएगस म्हणाल्या, नगरपालिका कायद्यात आरक्षण हे रोटेशन पद्धतीने करावे, असे स्पष्ट म्हटलेले असताना गेली ३0 वर्षे पाजीफोंड हा प्रभाग कधीही महिलांसाठी राखीव ठेवला गेलेला नाही. यामुळेच सरकारच्या राखीवतेच्या धोरणामागे कुठलेही ठोस कारण नाही (पान २ वर)