काशिराम म्हांबरे
लोकमत न्यूज नेटवर्कशिरगांव येथील देवी लईराईचे भाविक तसेच धोंडा विरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्य विधान करुन त्यांच्या भावना दुखवल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या श्रेया धारगळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावे. तसेच त्यांना राज्यातून हद्दपार करण्यात यावे अशी मागणी देवीच्या भक्तांनी म्हापशातील पोलीस स्थानकावर धडक देऊन केली.
धारगळकरांना अटक न केल्यास सर्व भक्तांना एकत्रीत करून कायदा हातात घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे पोलीस स्थानकाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वी कुंकळ्ळी तसेच डिचोलीतूनही धारगळकरांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरणीत संस्थान व महाजनांबाबत आक्षेपार्य व्हिडीओ व्हायरल करून बदनामी केल्या प्रकरणी दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी पोलिसांनी धारगळकरांना यापूर्वी अटक केली होती.
म्हापसा तसेच परिसरातील अनेक भक्तांनी येथील पोलीस स्थानकावर धडक देऊन श्रेया धारगळकर तसेच इतर अज्ञाता विरोधात तक्रार दाखल केली. नंतर उपस्थित भक्तगणातील शिष्टमंडळाने उपअधिक्षक संदेश चोडणकर तसेच निरीक्षक निखील पालयेकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली.
यावेळी महिला भक्तगण मोठ्या संखेने उपस्थित होत्या. उपस्थितांनी देवीचा जयजयकार केला तसेच धारगळकरा निशेद करून त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. देवीच्या भक्तांच्या भावना दुखवणाऱ्या अशा समाज कंटकावर कारवाई करून त्यांना राज्यातून हद्दपार करावे असेही भक्तगण मागणी करीत होते. केलेल्या मागणीवर आजच निर्णय घेऊन कारवाई करावी असेही भक्तगण म्हणत होते. अटक करण्यात आलेल्या धारगळकरांना सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कारवाई टाळण्यासाठी त्या ढोंग करीत असल्याचाही आरोप यावेळी करून धारगळकरांवर कारवाई करावी अशी मागणी रुपाली नाईक यांनी केली.
उपेंद्र गांवकर प्रविण आसोलकर यांनी यांनी धारगळकरांना अटक करावी अशी मागणी केली. तसेच देवळात जाऊन सर्वांची जाहीर माफी मागावी असेही भक्तगण म्हणाले. निरीक्षक निखील पालयेकर यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन भक्तांना यावेळी दिले.
दरम्यान काही दिवसापूर्वी सोशल मिडीयावर देवी लईराईच्या जत्रेसंबंधी चुकिचा पोस्ट टाकणाऱ्या त्या मुलीवरही कारवाई व्हावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. ती मुलगी अल्पवयिन असल्याने त्या मुलीचा आईने माफी मागीतली होती पण की मुलगी अल्पवयिन नसल्याचा दावा भक्तगण गुन्हा नोंदवून अटक करण्याची मागणी करीत होते.