अस्नोडा, डिचोली, साखळी व पाळीत नवे पुल, 7 हजार कोटींची कामे केंद्राकडून तत्त्वत: मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 09:18 PM2018-05-28T21:18:32+5:302018-05-28T21:18:32+5:30

उत्तर गोव्यातील अस्नोडा, साखळी, डिचोली आणि पाळी येथे नवे पुल बांधले जाणार आहेत. तसेच सर्व प्रमुख मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे.

Asana, Dicholi, Chatchy and new bridges, 7 thousand crores works are approved by the center | अस्नोडा, डिचोली, साखळी व पाळीत नवे पुल, 7 हजार कोटींची कामे केंद्राकडून तत्त्वत: मंजूर

अस्नोडा, डिचोली, साखळी व पाळीत नवे पुल, 7 हजार कोटींची कामे केंद्राकडून तत्त्वत: मंजूर

Next

पणजी : उत्तर गोव्यातील अस्नोडा, साखळी, डिचोली आणि पाळी येथे नवे पुल बांधले जाणार आहेत. तसेच सर्व प्रमुख मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी तत्त्वत: मंजुरी दिली आहे. एकूण सात हजार कोटी रुपयांची कामे तत्त्वत: मंजुर झाली आहेत. ही माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री ढवळीकर म्हणाले, की केंद्रातील एनडीए सरकारने गोव्यासाठी हजारो कोटींची कामे मंजुर केली. सध्या आठ हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. आता आणखी सात हजार कोटींची कामे तत्त्वत: मान्य झाली आहेत. अस्नोडा, साखळी, डिचोली व पाळी पुलाच्या कामावर आणि रस्त्यांच्या चौपदरीकरणावर मिळून एकूण आठशे कोटी रुपये खर्च केले जातील. केंद्रातील मोदी सरकारने 3क् हजार कोटींच्या आसपास खर्चाची कामे गोव्याला दिली. त्यापैकी सर्वात जास्त कामे ही सार्वजनिक बांधकाम खात्याला मिळाली. खात्याची वार्षिक योजना ही कायम 1क्क् कोटी रुपयांच्या आसपास असायची पण यंदा प्रथमच केंद्राने बांधकाम खात्याची साडेसातशे कोटींची योजना मंजुर केली आहे.
मंत्री ढवळीकर म्हणाले, की मोले ते खांडेपार, फोंडय़ाचे जुने आरटीओ कार्यालय ते जुनेगोवे, बोरी पुल व बोरी रस्ता ते फोंडा, आरटीओ फोंडा ते कुर्टी अशी कामे तत्त्वत: मान्य झाली आहेत. 1क्5 किलोमीटर लांबीच्या नव्या राष्ट्रीय महामार्गाचे काम केले जाईल. करासवाडा येथेही काम होईल. भारतमाला प्रकल्पांतर्गत 22क् किलोमीटरच्या रस्त्याची कामे केली जातील. या शिवाय सागरमाला योजनेंतर्गत
एकूण सात जेटींचे बांधकाम करण्यासाठी केंद्राने 97 कोटी रुपये मंजुर केले आहेत. दोनापावल, पणजी, सावर्डे आदी ठिकाणी जेटींचे काम केले जाईल. गालजीबाग-तळपण पुलाचे काम हे येत्या मार्च 2क्19 र्पयत पूर्ण होणार आहे. खांडेपार पुलाचे उद्घाटन जूनच्या अखेरीस केले जाईल. कुर्टी येथील बायपासचे काम आम्ही मार्च 2क्19 मध्ये पूर्ण करू. एमपीटी ते दाबोळी विमानतळ अशा फ्लायओव्हरचे काम सुरू आहे.
दुचाकींसाठी स्वतंत्र लेन (चौकट)
मंत्री ढवळीकर म्हणाले, की सर्व राज्य कनेक्टीवीटीची कामेही यापूर्वी सुरू झाली. सीआरएफ फंडखालीही केंद्राने निधी दिला व गोव्यात मलनिस्सारणविषयक कामे करण्यासाठीही अर्थसाह्य केले आहे. राज्यातील सर्व महामार्गाची कामे व जुवारी पुलाशीनिगडीत रस्त्यांची कामे यासाठी मिळून एकूण साडेसहा लाख चौरस मीटर क्षेत्रफळाचे सरकार भूसंपादन करणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व महामार्गाचे रुंदीकरण करताना आता दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र लेन ठेवली जात आहे. रायबंदरच्या बायपासवर तशी सोय यापूर्वीच केली आहे.

Web Title: Asana, Dicholi, Chatchy and new bridges, 7 thousand crores works are approved by the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.