पणजी: राज्यात रेंट अ कारमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढू लागल्याने या वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतला आहे. त्यानुसार रेंट अ कार वाहनांना स्पीड गर्व्हन्स बसवण्याची सक्ती केली आहे.
वाहतूक खात्याचे संचालक आयएएस अधिकारी पी. प्रविमल अभिषेक यांनी हा आदेश जारी केला आहे. सर्व वाहतूक सहाय्यक संचालकांना (एडीटी) यांना याबाबतचा कृती अहवाल ११ मार्च पूर्वी सादर करावा. या अहवालाचा १२ मार्च रोजी आढावा घेतला जाईल असे निर्देशही या आदेशात संचालकांनी दिले आहेत.
राज्यात रेंट अ कारमुळे अपघात वाढू लागले असून आता पर्यंत अनेकांचा यात नाहक बळी गेला आहे. पर्यटकांकडून अनेकांना मद्यपान करुन तसेच बेशिस्तपणे ही वाहने चालवली जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रेंट अ कार सेवे विरोधात संताप व्यक्त करुत ही सेवा बंद करावी अशी मागणी होत आहे. याची दखल घेऊन रेंट अ कार ना स्पीट गर्व्हन्स बसवण्याची सक्ती वाहतूक खात्याने केली आहे.