पुढील पर्यटन हंगामाबाबत गोव्यातील व्यावसायिक आशावादी पण किनाऱ्यांवरील ८0 टक्के शॅकवाल्यांनी धंदा गुंडाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 12:48 PM2018-05-17T12:48:00+5:302018-05-17T12:48:00+5:30

गोव्यात पावसाळ्यानंतर येणारा पुढील पर्यटन हंगाम व्यवसायाच्यादृष्टिने चांगला जाईल, अशी आशा या क्षेत्रातील व्यावसायिक बाळगून आहेत.

business persons in goa are hoping for good business condition for next tourist season | पुढील पर्यटन हंगामाबाबत गोव्यातील व्यावसायिक आशावादी पण किनाऱ्यांवरील ८0 टक्के शॅकवाल्यांनी धंदा गुंडाळला

पुढील पर्यटन हंगामाबाबत गोव्यातील व्यावसायिक आशावादी पण किनाऱ्यांवरील ८0 टक्के शॅकवाल्यांनी धंदा गुंडाळला

googlenewsNext

पणजी : गोव्यात पावसाळ्यानंतर येणारा पुढील पर्यटन हंगाम व्यवसायाच्यादृष्टिने चांगला जाईल, अशी आशा या क्षेत्रातील व्यावसायिक बाळगून आहेत. दुसरीकडे किनाऱ्यांवरील ८0 टक्के शॅकवाल्यांनी आपला व्यवसाय गुंडाळला आहे. जीएसटी तसेच अन्य कारणांमुळे मंदीमुळे यंदा पर्यटकांचे प्रमाण तुलनेत कमी असल्याचा दावा व्यावसायिकांकडून केला जात आहे. तर पर्यटन खात्याचे म्हणणे असे आहे की, देशी आणि विदेशी दोन्ही पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. 

अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ म्हणाले की, दक्षिण गोव्यात केळशी किनाऱ्यावर १७ पैकी केवळ एकच शॅक कार्यरत आहे. कळंगुट, कांदोळी, बागा किनाऱ्यांवर ६0 टक्के शॅक काढण्यात आले. नोटाबंदीचा परिणाम अजून जाणवत आहे. अन्न पदार्थ तसेच इतर वस्तूंवर जीएसटी लागू केल्याने पर्यटक दुरावले आहेत. दुसरी बाब म्हणजे पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्याची गरज आहे. पर्यटनाच्या बाबतीत श्रीलंका, थायलँड, मलेशिया या राष्ट्रांपेक्षा भारत मागे आहे. तेथे स्वस्ताईमुळेही पर्यटक आकर्षित होत आहेत. 
पर्यटन संचालक मिनीन डिसोझा म्हणाले की, पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात साधारणपणे ८0 लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती. यंदा हे प्रमाण आणखी वाढलेले आहे. 
दुसरीकडे खाजगी जमिनींमधील शॅकना यापुढे पावसाळ्यात शॅक काढावे लागणार नाहीत. त्यासाठी सीआरझेड कायद्यात दुरुस्ती आणली जात आहे. १८ जूनपर्यंत सरकारने हरकती व सूचना मागविल्या आहेत. खाजगी जमिनीत असलेली शॅक बांधकामे न हटविता ती केवळ प्लास्टिकची आश्चादने करुन झाकून ठेवल्याचेही चित्र काही किनाºयांवर दिसत आहे. 
  
अद्याप नुकसान भरपाई नाही
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ओखी वादळात किनाऱ्यांवरील शॅकमध्ये समुद्राचे पाणी घुसून झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शॅकमालकांना मिळालेली नाही, असे कार्दोझ यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘मोरजी, मांद्रे, हरमल, केळशी, बाणावली भागात किनाऱ्यांवर शॅकमध्ये पाणी घुसून मोठी हानी झाली होती. एका अंदाजानुसार ७५ लाख रुपयांहून अधिक हानी झाली असून सरकारने यावर काहीच हालचाली केलेल्या नाहीत. या विषयाचा आता पाठपुरावा करणार आहोत.’
         
पुढील पर्यटन हंगामाबाबत आशावादी 
दरम्यान, पावसाळ्यानंतर येणारा पुढील पर्यटन हंगाम चांगला जाईल, याबाबत खास करुन चार्टर टूर ऑपरेटर्स आशावादी आहेत. ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अर्नेस्ट डायस म्हणाले की, ‘दाबोळी विमानतळावरील धावपट्टीच्या वापराबाबत नौदलाकडून निर्बंध कायम राहतील, असे वाटले होते. परंतु गेल्याच आठवड्यात नौदल अधिकारी आणि विमानतळ प्राधिकरण अधिकारी यांच्यासोबत झालेली बैठक फलदायी ठरल्याने चार्टर विमानांसमोर असलेला अडसर दूर झालेला आहे.’

Web Title: business persons in goa are hoping for good business condition for next tourist season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.