मुख्यमंत्रीपद मिरवण्यासाठी नव्हे जनसेवेसाठी : प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 03:19 PM2024-03-16T15:19:56+5:302024-03-16T15:21:02+5:30
पाच वर्षांचा कालावधी पूर्ण
डिचोली/ विशांत वझे
जेव्हा सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो तेव्हा सर्वसामान्य जनतेच्या भावना खऱ्या अर्थाने स म जु शकतो. मुख्यमंत्री पद हे मिरवण्यासाठी नसून जन सेवेसाठी आहे. पाच वर्ष पूर्ण करण्याचा अनुभव विलक्षण असून अनेक क्षेत्रात यश मिळतेय याचे समाधान आहे. पहिल्या दोन वर्षात भिवपाची गरज ना चा नारा आज टेक लाईन ठरली आहे . मोदीजी च्या नेतृत्वाखाली पाच वर्ष मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना जनतेचे प्रश्न सोडवता आले याचे समाधान आहेअसे मुख्यमंत्रीडॉ प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
राज्यात सलगपाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून कार्यात असताना अनेक अनुभव आले.सुरवातीच्या काळातील कोविद् मुळे खूप आव्हाने स्वीकारावी लागली . त्यावर यशस्वी मात करताना स्वयंपूर्ण गोवा चां नारा दिला अनेक नवे बदल आणले प्रशासन, अनुशासन, व एकूणच सर्व क्षेत्रात आज बदल दिसून येत आहे.देशात मजबूत सुरक्षा असलेले मोदींचे नेतृत्व तसेच राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार या मुळे डबल इंजिन ने राज्यात पायाभूत व मानवी विकासात मोठी झेप घेतली जनतेला काय अपेक्षित आहे याचा सारासार विचार करून निर्णय घेतले त्याचे सकारात्मक परिणाम समोर येताना अनेक क्षेत्रात विकासाला चालना मिळाली सर्व घटकांना सामावून घेण्याचे कार्य करता आले.
हे मोठे समाधान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले .पुन्हा एकदा देशात भाजप चे सरकार स्थापन होणार असून पंतप्रधान मोदिजी देशाची धुरा सांभाळतील गोव्याच्या दोन्ही जागा भाजप जिकणार असा विश्वास डॉ सावंत यांनी व्यक्त करताना अज पर्यंत मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचे निश्चित समाधान असल्याचे सांगताना राज्याला अजूनही मोठी उंची गाठायची असून सर्वांच्या सहकार्यानेच हे कार्य पुढे न्यायचे असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
साखळी मतदार संघात जिल्हा निधीतून एक कोटी रुपये विकास योजनांचा शुभारंभ डॉ सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी जिल्हा अध्यक्ष सिद्धेश नाईक ,गोपाळ सूर्लक र, रश्मी देसाई आनंद काणेकर विश्रांतीसूर्लिकर, कृष्णा गावस आदी उपस्थित होते.
पूर्वीचे काँग्रेस सरकार हे घोटाळे करण्यासाठी प्रसिद्ध होत .आता भाजप सरकार ने विकासाचा ध्यास घेत देश राज्य व प्रत्येक गावसाठी विकासाला चालना देत नवी क्रांती घडवण्यासाठी प्रसिद्ध असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सागितले.