मुख्यमंत्र्यांचा दक्षिण गोव्यात झंझावात; दिवसभर हजारो लोकांशी संवाद व गाठीभेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2024 10:43 AM2024-03-14T10:43:58+5:302024-03-14T10:46:05+5:30
आयआयटी रिवणमध्येच होणार असल्याचा पुरुच्चार.
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा/मडगाव: लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दक्षिण गोवा पिंजून काढण्याचा प्रयत्न केला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांनी दक्षिण गोव्यातील विविध भागांचा दौरा करून हजारो लोकांशी संवाद साधला, विविध घोषणाही केल्या, आयआयटी हा शैक्षणिक प्रकल्प रिवण-सांगे येथेच होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
फौडा, मडगाव, सांगे, सावर्डे, कुडचडे अशा विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री काल, बुधवारी फिरून आले. अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी व्यापारी, महिला, पुरुष, युवा यांच्याशी संवाद साधला, अनेक बैठका व सभांवेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तिकीटाच्या स्पर्धेत असलेले नरेंद्र सावईकर व बाबू कवळेकर हेही मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते. काही मंत्री, आमदारांनीही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भाग घेतला, मुख्यमंत्र्यांनी लोकांना विविध आश्वासनेही दिली.
३० हजार कोटी राज्याला मिळाले
गोव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीच कमी पडू दिले नाही. साधन सुविधा उभारण्यासाठी तब्बल ३० हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. ज्वा अम्वाद जेलमध्ये आमच्या स्वतंत्र्याच्या आतवणी आहेत, त्याची परिस्थिती बिकट करून ठेवण्याचे काम आतापर्यंतच्या सरकारने केले होते. परंतु आज त्याचा कायापालट झालेला आहे.
आम्ही काम दिले...
काँग्रेसच्या आतापर्यंत केवल 'हात' दाखवण्याचे काम केले आहे. मात्र, भाजप सरकारने त्याच हातांना आता काम मिळवून दिले आहे. गेल्या दहा वांत कौशल्य विकास व इतर उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार, उद्योग-व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आता नवे शैक्षणिक धोरण सरकार राबवणार आहे. त्यामुळे राज्यात नवीन शैक्षणिक क्रांती घडणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले,
आता नव्या सर्वेक्षणानंतर दक्षिणचा उमेदवार
भाजपाने लोकसभेसाठी ७२ उमेदवारांची दूसरी यादी जाहीर केली असून या यादीत दक्षिण गोव्याचा समावेश नाही. महिला उमेदवार देण्याचा पेच कावम असून यामुळेच तिकीट रखडले आहे. त्यामुळे नव्या सर्वेक्षणानंतरच भाजप दक्षिणेतील आपला उमेदवार ठरवणार आहे. पक्षाच्या कोअर कमिटीची बैठकही झाली. परंतु महिला उमेदवार निश्चित होऊ शकला नाही. त्यामुळे सर्वेक्षणानंतर भाजप दक्षिणेतील उमेदवार देणार आहे. सर्वेक्षण केल्यानंतर कोणाच्या बाजूने कोल आहे, हे पाहूनच भाजप उमेदवारी देत असतो. परंतु आता महिला उमेदवाराचा विषय पुढे आला आहे.
खंवटे, नाईक, कामत, तुयेकर प्रचारप्रमुख
भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी प्रचारप्रमुख म्हणून मडगावचे आमदार दिगंबर कामत व नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांची नियुक्त्ती फैली आहे. तर भाजपने उत्तर गोवा मतदारसंघात प्रचाराची धुरा पर्यटनमंत्री रोहन खंवटे व साळगावचे आमदार केदार नाईक यांच्याकडे सोपवली आहे
काँग्रेसचाही गुंता सुटेना
दुसरीकडे कॉग्रेस दोनपैकी एकही उमेदवार जाहीर करु शकलेला नाही, दक्षिण गोव्यात कॉंग्रेसने विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना उमेदवारी दिल्यास गोवा फॉरवर्ड पाठिंबा देणार नाही, असे आमदार विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांना काँग्रेस उमेदवार कधी जाहीर करणार? असे विचारले असता ते म्हणाले की, पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पुढील तीन ते चार दिवसात होईल. गोव्याचे उमेदवार जाहीर करायचे असल्यास श्रेष्ठी त्याआधी मला बोलावून घेतील.
सार्दिन यांच्यावर टीका
सांगे पालिकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्यावर निशाणा साधला, सरकारने युवकांसाठी विविध योजना आणल्या आहेत. तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठीही प्रयल केले आहेत, खासदार सार्दिन यांना सांगे मतदारसंघात कुणीही ओळखत नाही, ते लोकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. जो विकास झाला आहे, तो फळदेसाई यांच्या कार्यकाळातच झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.