coronavirus: गोव्यात व्हर्च्युअल इफ्फी शक्य, प्रकाश जावडेकर यांचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 07:45 PM2020-08-17T19:45:28+5:302020-08-17T19:45:36+5:30
दरवर्षी दि. 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पणजीत होतो. यंदा 51 वे वर्ष आहे. केंद्रीय चित्रपट महोत्सव संचालनालयाने व गोवा सरकारच्या मनोरंजन संस्थेनेही इफ्फीच्या आयोजनाची तयारी चालवली आहे.
पणजी - कोविडची स्थिती नियंत्रणात आली व कोरोना रुग्ण संख्या घटली तरच 51 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एरव्हीप्रमाणो होईल, अन्यथा गोव्यात यंदा व्हर्च्युअल इफ्फी होईल, असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी स्पष्ट केले.
दरवर्षी दि. 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पणजीत होतो. यंदा 51 वे वर्ष आहे. केंद्रीय चित्रपट महोत्सव संचालनालयाने व गोवा सरकारच्या मनोरंजन संस्थेनेही इफ्फीच्या आयोजनाची तयारी चालवली आहे. मात्र गोव्यात कोविडग्रस्तांची संख्या प्रचंड वाढली आहे. रोज नव्या तीनशे ते पाचशे कोविड रुग्णांची भर पडते. आतार्पयत शंभरहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र तयारी असायला हवी म्हणून इफ्फीची तयारी केली जात आहे. प्रत्यक्ष इफ्फी होणार की नाही हा प्रश्नच आहे. देशात कोविडग्रस्तांची संख्या खूप वाढलीय. इफ्फीला देश- विदेशातून प्रतिनिधी येत असतात.
या पाश्र्वभूमीवर जावडेकर यांनी वच्यरुअल इफ्फीच्या आयोजनाचे विधान सोमवारी केले. कोविडमुळे अगोदरच देशातील अनेक चित्रपट महोत्सव व मोठे सोहळे पुढे ढकलले गेले आहेत. केन्स चित्रपट महोत्सवही होऊ शकला नाही, तो वच्यरुअल पद्धतीने झाला. कोविड नियंत्रणात आला नाही तर केन्सप्रमाणोच व्हर्च्युअल पद्धतीने इफ्फी होईल. महोत्सवावेळी चित्रपटगृहांमध्ये सिनेमा दाखविले जाणार नाहीत.
इफ्फीसाठी चारशेहून अधिक विदेशी सिनेमांच्या प्रवेशिका आल्या आहेत. पणजीतील आयनॉक्स मल्टिप्लेक्स पूर्णपणो नवा बांधला जात आहे. आत सगळी मोडतोड केली गेली आहे. तिथे अनेक आधुनिक सुविधांची निर्मिती होत आहे. सरकारला खर्च करावा लागत नाही, संबंधित कंत्रटदार कंपनीच खर्च करत आहे, असे मनोरंजन संस्थेच्या सुत्रंनी सांगितले.