शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
4
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
5
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
6
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
7
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
8
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
9
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
10
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
11
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
12
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
13
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
14
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
15
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
16
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
17
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
18
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
19
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
20
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

कारकून भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार

By admin | Published: September 29, 2015 1:50 AM

पणजी : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून पदांच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मागील वर्षी करूनही पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी

पणजी : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून पदांच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार मागील वर्षी करूनही पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप युनायटेड गोवन्स फाउंडेशनच्या पदाधिकारी स्वाती केरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष केणी व सचिव अविनाश तावारीस उपस्थित होते. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात १३ अव्वल कारकून पदे भरण्यात आली होती. या पदांच्या भरतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणी ११ सप्टेंबर २0१४ मध्ये मडगाव पोलीस स्थानकात फाउंडेशनतर्फे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही, असे केरकर म्हणाल्या. या प्रकरणाची तक्रार गृह खाते आणि भ्रष्टाचारविरोधी पथकाकडेही करण्यात आली. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर गृह खात्याने व भ्रष्टाचारविरोधी पथकाने एफआयआर नोंद करावा, असा आदेश दिला होता. मात्र, अजूनही आदेशाचे पालन करण्यात आलेले नाही. कारकून पदासाठी अर्ज केलेल्या काही उमेदवारांनी संगणकीय अभ्यासक्रमाची प्रमाणपत्रे बनावट जोडली आहेत. तर काही उमेदवारांना जाणूनबुजून लेखी परीक्षेत ज्यादा तर काहींना कमी गुण देण्यात आले आहेत. याशिवाय बनावट संगणकीय प्रमाणपत्र लावलेल्यांमध्ये सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्या नातेवाईकाचाही समावेश असल्याचे केरकर म्हणाल्या. (प्रतिनिधी)