गोव्यात धार्मिक प्रतिकांची मोडतोड सुरूच
By admin | Published: July 13, 2017 03:55 PM2017-07-13T15:55:21+5:302017-07-13T15:55:21+5:30
गोव्यामध्ये समाजकंटकांकडून धार्मिक स्थळं व प्रतिकांची मोडतोड करण्याचे प्रकार सुरूच आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
मडगाव ( गोवा ), दि. 13 - गोव्यात समाजकंटकांकडून धार्मिक स्थळं व प्रतिकांची मोडतोड करण्याचे प्रकार सुरूच आहेत. बुधवारी रात्रीही दक्षिण गोव्यातील लोटली गावात अशी घटना घडली. पोलीस बंदोबस्त वाढवूनदेखील दक्षिण गोव्यात धार्मिक प्रतिकाच्या मोडतोडीचे प्रकार थांबलेले नाहीत.
उलट येथून सुमारे आठ किलोमीटरवरील लोटली गावातील धार्मिक प्रतिकांची समाजकंटकांनी मोडतोड केली. या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटले आहेत. काँग्रेसने पोलिसांना अपयश येत असल्याने धार्मिक प्रतिमांच्या मोडतोडीचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी केली आहे.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, मंत्री विजय सरदेसाई यांनी तर या घटनेस जबाबदार असलेल्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देत दिसताक्षणी गोळ्या झाडायला हव्यात, असे मत व्यक्त केले आहे. धार्मिक संस्था व राज्यपालांनी धार्मिक सलोखा जपण्याचे आवाहन केले आहे.
भाजपाचे आमदार नीलेश काब्राल आणि मायकल लोबो यांनी भाजपाला घरचा अहेर दिला आहे. लोबो यांनी पोलिसांवर ठपका ठेवला आहे तर काब्राल यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा आपल्याच सरकारला दिलेला आहे.