शिवजयंती महोत्सवाच्या आयोजनासाठी पर्यटन खात्याकडून निविदा जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2024 03:50 PM2024-01-28T15:50:45+5:302024-01-28T15:51:23+5:30
१९ राेजी डिचाेली व पर्वरी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन.
नारायण गावस, पणजी:छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाचे औचित्य साधून गोवा पर्यटन खात्यातर्फे १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी डिचोली येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि पर्वरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी पर्यटन खात्याने एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा काढली आहे.
या उत्सवाच्या माध्यमातून, सरकारचे उद्दिष्ट म्हणजे तरुण पिढीला राष्ट्रहितासाठी कार्य करण्यास प्रवृत्त करणे मुख्य उद्देश म्हणजे तरुणांना राष्ट्रहितासाठी काम करण्यासाठी प्रेरित करण्याचा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उस्तव हा राज्यभर सर्वत्र माेठ्या उत्साहात साजरा होणार आहे. पण पर्यटन खात्याने खास राज्यपातळीवर हा उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहेे. त्या निमित्त येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. तसेच विविध कलाकारांची उपस्थिती असणार आहे. भव्य महाराजाच्या वेशभूषेत रॅलीही काढली जाणार आहे.
राज्यातील सर्व लहान माेठ्या शहरात तसेच गावागावात शिवजयंती साजरी केली जाते. पण यावेळी माेठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या जाणार. ढाेल ताशाच्या गजरात महाराजांना मानवंदना दिल्या जातात. पर्यटन खात्यातर्फे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु धर्म टिकवण्यासाठी फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभर प्रयत्न केले आहेत. गोव्यातही स्वधर्माची संकल्पना, ज्या काळात धर्मांतर होत होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली डिचाेली येथेही सप्तकोटेश्वर मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले, असे पर्यटन खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.