म्हापसा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विराज फडकेंचा राजीनामा
By काशिराम म्हांबरे | Published: February 21, 2024 04:09 PM2024-02-21T16:09:13+5:302024-02-21T16:09:33+5:30
नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनीही ८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता.
म्हापसा: म्हापसा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विराज फडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. सत्ताधारी गटात झालेल्या करारानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पालिका प्रशासन संचालनालयाकडे आज सादर केला.
नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनीही ८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता. त्यांच्या जागी नव्या नगराध्यक्षांची निवड शुक्रवार २३ रोजी होणाºया मंडळाच्या विशेष बैठकीतून केली जाणार आहे. नगरसेविका डॉ. नुतन बिचोलकर यांची नगराध्यक्षपदी निवड निश्चित मानली जाते.
विराज फडके यांची गेल्या वर्षी १५ फेब्रुवारी रोजी उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती. सुमारे वर्षभर या पदी राहिल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. म्हापसा मतदार संघातील भाजपचे मंडल अध्यक्ष नगरसेवक सुशांत हरमलकर यांची उपनगराध्यक्षपदादी निवड होण्याची संभावना आहे.
सत्ताधारी गटात झालेल्या करारानुसार उपनगराध्यक्षपदी वर्षभर राहिल्यानंतर आपण आपल्या पदाचा राजीनामा सादर केल्याचे फडके म्हणाले. मागील वर्षभरात उपलब्ध असलेल्या सुविधातून जास्तीच जास्त विकास कामे करण्याचा शहरवासियांनी सुविदा उपलब्ध करुन देण्याचा आपण प्रयत्न केला पण काही कामे अपूर्ण राहिल्याची खंत मनात आहे. आपली खंत आपल्या जागी निवड होणाºयाकडून पूर्ण केली जाईल असा विश्वास विराज फडके यांनी व्यक्त केला.