राज्याचा सर्वांगीण विकास हीच मोदींची गॅरंटी; पंतप्रधानांची घोषणा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2024 12:46 PM2024-02-07T12:46:02+5:302024-02-07T12:47:02+5:30

मडगाव येथील जाहीर सभेस विक्रमी उपस्थिती; विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण.

development of the state is modi guarantee said pm in goa visit | राज्याचा सर्वांगीण विकास हीच मोदींची गॅरंटी; पंतप्रधानांची घोषणा 

राज्याचा सर्वांगीण विकास हीच मोदींची गॅरंटी; पंतप्रधानांची घोषणा 

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव 'गोव्याने प्रत्येक क्षेत्रात चौफेर कामगिरी बजावली आहे. विकासही साधला आहे. डबल इंजिन सरकार गोव्याचा आणखी विकास करेल ही मोदीची गॅरंटी आहे' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एक दिवसाच्या गोवा दौऱ्यावर आलेले मोदी यांनी काल येथे विराट सभेला संबोधित केले, सभेला हजारो लोकांची उपस्थिती लाभली.

व्यासपीठावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांचे फुलांचा भला मोठा हार घालून स्वागत करण्यात आले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'गोव्याने जागतिक दर्जाचे इव्हेंट्स घडवून आणले आहेत. त्यामुळे जगभरात गोव्याचे नाव झाले आहे. डबल इंजिन सरकार गोव्याला आकर्षण केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. गोवा हे इको टुरिज्ञाम आणि कॉन्फरन्स टुरिझम सेंटर म्हणून विकसित केले जाईल, नजीकच्या भविष्यात या सुंदर राज्यात अनेक परिषदा होणार आहेत. गोव्यात पर्यटन विकासासह रोजगाराच्या संधी निर्माण होतील. गोव्यात झालेल्या जी ट्रॅटी परिषदेने राज्याच्या विकासाचा मार्ग तयार केला. डबल इंजिन सरकार गोव्याच्या विकासाला गती देईल.'

कुंकळ्ळी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दोनापावल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्टस, बेती येथील आयएनएस मांडवी नेव्हल वॉर कॉलेजचे नवीन कॅम्पस आणि कुडचड़े येथील एकात्मिक कचरा व्यवस्थापन सुविधा या चार प्रकल्पांचे उद्‌घाटन, तसेच रेडश मागुश येथील पीपीपी तत्त्वावर येऊ घातलेला 'रोप वे प्रकल्प, पाटो-पणजी येथील थी डी-प्रिंटेड इमारत आणि शेळपे, साळावली येथील १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी मोदींनी रिमोट कंट्रोलद्वारे बटन दाबून व्हच्र्युअल पद्धतीने केली, व्यासपीठावर सभापती रमेश तवडकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री माविन गुदिन्हो, सुभाष शिरोडकर, सुदिन ढवळीकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, रवी नाईक, आमदार दिगंबर कामत आदी उपस्थित होते. कदंब बसस्थानकावर आयोजित सभेत प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

सभेच्या ठिकाणी लोकांना आणण्यासाठी मंत्री, आमदारांनी बससेवाही उपलब्ध केल्या, सकाळी अकरा वाजताच लोक सभास्थानी पोहोचले होते. सभेला ५० ते ६० हजार लोक उपस्थित असल्याचा सरकारी सूत्रांचा दावा आहे. दरम्यान, सभेच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. प्रत्येकाची तपासणी करूनच आत प्रवेश दिला जात होता. सभेला प्रचंड गर्दी झाली. एकीकडे उन्हाचीही झळ बसत होती. त्यात अनेक ठिकाणी पंख्याची सोय नव्हती.

लोकांची गर्दी असल्याने मुख्यमंत्र्यांनी सभा संपल्यानंतर कुणीही घाईगडबड करू नये, शांततेने व शिस्तीत बाहेर जावे असे आवाहन केले. लोकांनीही मुख्यमंत्र्यांचे म्हणणे ऐकून शांततेने सभास्थान सोडले. सभा संपल्यानंतर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली, मात्र, पोलिसांनी संयमाने ही परिस्थिती हाताळत कोंडी दूर केली.

लॉजिस्टिक, शैक्षणिक हब

कनेक्टिव्हिटी वाढवून गोवा लॉजिस्टिक हब बनवू, तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी जागतिक स्थळ म्हणून, तसेच शैक्षणिक हब म्हणूनही विकसित करू, अशा घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या. त्यांच्या या आस्वासनावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ते म्हणाले, गोव्याची भूमी पावन आहे. दामोदर साल येथे स्वामी विवेकानंद आले होते. त्यांना नवीन प्रेरणा लाभली, ऐतिहासिक लोहिया मैदानावर मुक्तीलळ्याची ज्योत पेठविली गेली असे सांगत त्यांनी गोव्याच्या विकासाचा मागोवा घेतला.

१३३० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

'विकसित भारत, विकसित गोवा २०४७ कार्यक्रमांतर्गत १३३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उदघाटन आणि पायाभरणी मोदींच्या हस्ते यावेळी झाली. पंतप्रधानांनी रोजगार मेळ्यांतर्गत विविध विभागांमधील १९३० नवीन सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेशही वितरित केले.

भाषणाची सुरुवात कोंकणीतून

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीला, कोंकणीतून समेस्त गोयकारांक मनातल्यान फाळजानसान नमस्कार' असे शब्द उच्चारताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात व ढोल वाजवून त्यांना दाद दिली. मुख्यमंत्री सावंत यांनी जय जय श्रीराम म्हणत भाषण सुरू केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्यामुळे सर्वकाही शक्य आहे. गोव्यातील आणि देशातील पायाभूत साधन-सुविधांच्या विकासाचे श्रेय पंतप्रधानांना जाते. आमचे सरकार अंत्योदय तत्त्वावर चालणारे आहे. लहान घटकांना बरोबर घेऊन आम्ही वाटचाल सुरू ठेवली आहे. केंद्र सरकारच्या साथीने डबल इंजिन सरकारने विविध विकास प्रकल्प पूर्ण केले आहेत. आता नव्या प्रकल्पांना सुरुवातही केली जात आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली चौफेर विकास करू', असे ते म्हणाले.

एक भारत, श्रेष्ठ भारत'चे उत्तम उदाहरण

पंतप्रधान म्हणाले की, 'काही राजकीय पक्ष खोटारडेपणा करून भीती पसरवण्याचे राजकारण करीत आहेत. गोव्यात ख्रिस्ती व इतर बांधव जसे सलोख्याने राहतात, ते एक भारत, श्रेष्ठ भारत'चे उत्तम उदाहरण आहे.

'या' मान्यवरांचा केला आवर्जून उल्लेख

पंतप्रधान म्हणाले की, 'देश- विदेशातील पर्यटकांमध्ये गोवा लोकप्रिय व पसंतीचे ठिकाण आहे. गोव्याला स्वतःची ओळख व अस्मिता आहे. अनेक कलाकार व संत, महंत गोव्यात जन्मले. गानकोकिळा लता मंगेशकर, सुरभी केसरबाई केरकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, संत सोहिरोबानाथ आंबिये, आचार्य धर्मानंद कोसंबी, कृष्ण भट बांटकर आणि इतर अनेक दिग्गज, कलाकार, संत महत गोव्यात जन्मले.

विरोधकांना झिडकारले

लोकांना खोटी आस्वासने देणाऱ्यांना गोमंतकीय जनतेने ब्रिडकारले आहे. सुशासन हा विकासाचा मॉडेल आहे. घरात नळजोडणी, हागणदारी मुक्ती, घराघरात वीज, एलपीजी कनेक्शन आदी योजनांत या राज्याने १०० टक्के यश मिळविले आहे. देशात चार कोटी लोकांना पक्क्या घरांचा लाभ मिळाला आहे. आणखी दोन कोटी घरे बांधली जातील. गोव्यात कुणाकडे पक्के घर नाही, त्यानी सांगावे, पक्के घर बनवून दिले जाईल, ही मोदीची गॅरंटी आहे, असे त्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा, राज्याचा जो कायापालट केला जात आहे त्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, विकासकामांची वेगळी विचारधारा घेऊन लोकांसमोर गेले पाहिजे, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली यापुढेही विकासकामे राबवली जातील.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी गोव्यातील विकासाची गंगा पूर्णपणे पंतप्रधानांच्या आशीर्वादानेच असल्याचे सांगितले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद रोट तानावडे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी २०१४पासून प्रधानसेवक म्हणून काम केले आहे. भारत महाशक्ती होईल म्हणून न सर्व सर्वे जग आमच्याकडे बघत आहे. त्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली वाटचाल सुरू आहे. 

मंत्री आलेक्स यांनी पंतप्रधान मोदी है नव्या काळातील जागतिक नेतृत्व असल्याचे सांगितले. देश त्यांच्या व्हिजननुसार कार्यरत असल्याचे ते  म्हणाले. मंत्री माविन गुदिन्हो, आमदार दिगंबर कामत यांचीही भाषणे झाली.

 

Web Title: development of the state is modi guarantee said pm in goa visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.