वेर्णा आद्यौगिक वसाहतींमधील १६ भूखंडाचा ई लिलाव :जीआयडीसीचा निर्णय
By पूजा प्रभूगावकर | Published: January 13, 2024 02:17 PM2024-01-13T14:17:58+5:302024-01-13T14:18:05+5:30
वेर्णा ओद्यौगिक वसाहती मधील एकूण २.३९ लाख चौरस मीटरच्या १६ भूखंडांचा ई लिलाव करण्याचा निर्णय गोवा ओद्यौगिक विकास महामंडळाने (जीआयडीसी) घेतला आहे.
पणजी: वेर्णा ओद्यौगिक वसाहती मधील एकूण २.३९ लाख चौरस मीटरच्या १६ भूखंडांचा ई लिलाव करण्याचा निर्णय गोवा ओद्यौगिक विकास महामंडळाने (जीआयडीसी) घेतला आहे.
राज्यातील उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने सरकार वेर्णा आयडीसी मधील १६ भूखंडांचा ई लिलाव करण्याचा निर्णय जीआयडीसी ने घेतला आहे. १३ ते १५ मार्च दरम्यान हा ई लिलाव होईल. या ई लिलावाची प्रक्रिया एनआयसी ई लिलाव पोर्टलच्या https://eauction.gov.in वर हाेईल.
वेर्णा येथील ओद्यौगिक वसाहतीमधील १६ भूखंडाचा हा लिलाव होणार असून हे भूखंड अनुक्रमे ३३ हजार ७४३ चौरस मीटर , ३७ हजार ५०० चौरस मीटर, ४२ हजार ३०० चौरस मीटर,२८ हजार २००चौरस मीटर,२४ हजार ७७७ चौरस मीटर,२ हजार ९९२ चौरस मीटर,२ हजार चौरस मीटर, १ हजार चौरस मीटर, २ हजार चौरस मीटर,२५ हजार ६८५ चौरस मीटर, २ हजार १३८ चौरस मीटर,१ हजार ४२५ चौरस मीटर,१ हजार ४२५ चौरस मीटर,१ हजार ४२५ चौरस मीटर,२३ हजार ३५० चौरस मीटर व १० हजार ३ चौरस मीटर असे एकूण २.३९ लाख चौरस मीटरचे हे भूखंड आहेत.