सहावा कॅसिनो दाखल

By admin | Published: July 14, 2017 02:21 AM2017-07-14T02:21:27+5:302017-07-14T02:26:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : मांडवी नदीत आणखी तरंगते कॅसिनो नको, अशी मागणी सर्व स्तरांतून होत असताना, तसेच काही आमदार, बार्जमालक

Filed six casinos | सहावा कॅसिनो दाखल

सहावा कॅसिनो दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : मांडवी नदीत आणखी तरंगते कॅसिनो नको, अशी मागणी सर्व स्तरांतून होत असताना, तसेच काही आमदार, बार्जमालक व अन्य संस्थांनी सातत्याने विरोध करूनही अखेर सहावे कॅसिनो जहाज गुरुवारी मांडवी नदीत येथे दाखल झाले. त्यावर अजून जुगार सुरू झालेला नाही. या विषयावरून राज्यात मांडवी नदीतील कॅसिनो पुन्हा चर्चेस आले.
एम. व्ही. लकी सेव्हन कंपनीने
यापूर्वी सुमारे पन्नास कोटी रुपयांपेक्षा
जास्त शुल्क सरकारजमा केलेले आहे.
कंपनी ते सरकारला देणे होते. पार्सेकर सरकार अधिकारावर असताना ही
थकलेली रक्कम भरून घेण्यात आली. ते भरल्यानंतर मग कंपनीच्या अर्जावर विचार करता येईल, असे माजी मुख्यमंत्री
लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हटले होते.
गेल्या मार्चमध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार अधिकारावर आल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत विजय सरदेसाई व रोहन खंवटे या दोघा मंत्र्यांनी मांडवीत आणखी सहावा कॅसिनो नको, अशी भूमिका मांडली होती. उच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे जर सहाव्या कॅसिनोला मांडवी नदीत येण्यास
परवानगी द्यावी लागत असेल तर सरकारने त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे, अशी भूमिका सरकार घेईल, असे संकेत त्यावेळी गृह खात्याने दिले होते; पण त्याबाबत नंतर काही घडले नाही.
बार्ज संघटनेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष
मांडवी नदीत सध्या पाच कॅसिनो जहाजे आहेत. त्यात सहाव्या कॅसिनोची भर टाकल्यास मांडवी नदीतील जलमार्गांवर वाहतुकीची कोंडी होईल व मच्छीमारी होड्या, बार्ज व्यावसायिक, पर्यटक यांच्यासाठी ते अत्यंत घातक ठरेल, असा इशारा गोवा बार्जमालक संघटनेने दोन दिवसांपूर्वीच दिला होता. बार्ज व्यवसाय कोलमडेल, असे संघटनेचे अध्यक्ष रेमंड डिसा यांनी म्हटले होते; पण बंदर कप्तान खात्याने त्याचीही पर्वा केलेली नाही.

Web Title: Filed six casinos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.