कॉंग्रेसची महिलांना नारी न्याय अंतर्गत पाच गॅरंटी
By पूजा प्रभूगावकर | Published: March 16, 2024 01:52 PM2024-03-16T13:52:43+5:302024-03-16T13:52:53+5:30
पणजी: देशातील महिलांना कॉंग्रेस नारी न्याय अंतर्गत पाच गॅरंटी देत आहेत. आर्थिक सक्षमीकरण करतानाच त्यांच्या अधिकारांविरोधात आवाज उठवण्यासाठीही पाठिंबा ...
पणजी: देशातील महिलांना कॉंग्रेस नारी न्याय अंतर्गत पाच गॅरंटी देत आहेत. आर्थिक सक्षमीकरण करतानाच त्यांच्या अधिकारांविरोधात आवाज उठवण्यासाठीही पाठिंबा देणार असल्याचे प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नारी न्याय अंतर्गत कॉंग्रेसने महालक्ष्मी,आधी आबादी पुरा हक्क,शक्ती का सन्मान, अधिकार मैत्री व सावित्रीबाई फुले हॉस्टेल या पाच गॅरंटी दिल्या आहेत. लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेस निवडून आल्यानंतर या सर्व गॅरंटी पूर्ण करणार आहे. देशातील महिलांना न्याय तसेच त्यांचा अधिकार देण्यासाठी कॉंग्रेस कटिबध्द असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नाईक म्हणाल्या, की महालक्ष्मी योजने अंतर्गत कॉंग्रेस महिलांच्या बॅक खात्यात दर वर्षाला हप्त्यांमध्ये १ लाख रुपये जमा करेल. महागाईचा फटका महिलांना बसू नये यासाठी कॉंग्रेसचा प्रयत्न आहे.आधी आबादी पुरा हक्क अंतर्गत कॉंग्रेस सर्व केंद्र सरकारच्या खात्यांमध्ये महिलांसाठी ५० टक्के नोकऱ्या राखीव ठेवणार आहे. भाजप सरकारने रोजगारदृष्टया महिलांसाठी फारसे काहीच केलेले नाही. मात्र कॉंग्रेस या नोकऱ्यांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करेल असे त्यांनी सांगितले.