गोव्यात सर्वांना मुक्त प्रवेश; ताप असल्यासच चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 05:58 AM2020-06-09T05:58:44+5:302020-06-09T05:58:52+5:30

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी सकाळी सर्व मंत्र्यांची बैठक घेतली. मांगोरहीलच्या प्रकरणामुळे कोरोनाचे रुग्ण राज्यात वाढतात व दुसºया बाजूने सगळे व्यवहारही सुरू होत असल्याने परराज्यातून बरेच प्रवासी गोव्यात येत आहेत.

Free access to all in Goa; Test only if there is a fever | गोव्यात सर्वांना मुक्त प्रवेश; ताप असल्यासच चाचणी

गोव्यात सर्वांना मुक्त प्रवेश; ताप असल्यासच चाचणी

googlenewsNext

पणजी : राज्यात मोठ्या प्रमाणात लोकांचे येणो सुरू झाले आहे. रेल्वे, विमाने किंवा रस्तामार्गे जे लोक गोव्यात येतील, त्यांना यापुढे मुक्त प्रवेश मिळणार आहे. यापुढे नवी प्रक्रिया (एसओपी) लागू होणार आहे. त्यानुसार गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाची कोविड चाचणी होणार नाही, तापासारखी लक्षणो दिसली तरच चाचणी केली जाणार आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी सकाळी सर्व मंत्र्यांची बैठक घेतली. मांगोरहीलच्या प्रकरणामुळे कोरोनाचे रुग्ण राज्यात वाढतात व दुसºया बाजूने सगळे व्यवहारही सुरू होत असल्याने परराज्यातून बरेच प्रवासी गोव्यात येत आहेत. या पाश्र्वभूमीवर मंत्री व आमदारांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. कडक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा बहुतेक मंत्र्यांनी व्यक्त केली. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी वास्कोत पूर्ण लॉक डाऊन केले जावे असा मुद्दा मांडला. मात्र आरोग्यमंत्री विश्वजित राणे, विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी वेगळी भूमिका मांडली. एका विशिष्ट भागात कोरोना रुग्ण आढळले म्हणून पूर्ण शहरात लॉकडाऊन करण्याची गरज नाही. तसे झाल्यास लोक आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अडचणीत येतील, व्यवहार कायम बंद ठेवणे योग्य नव्हे असे लोबो व राणे म्हणाले.

Web Title: Free access to all in Goa; Test only if there is a fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.