म्हापसा : नवीन पर्यटन हंगामा सुरू झाल्यापासून तसेच मावळत्या वर्षातील अमली पदार्था विरोधात केलेल्या पेडणे पोलिसांनी केलेल्या सर्वात मोठ्या कारवाईत हरमल येथील किना-यावर दोन जर्मन विदेशी नागरिकांकडून ६४ लाख रुपयांचे एलएसडी ड्रग्स जप्त केला आहे.पेडणे पोलिसांनी १२ रोजी रात्री हरमल येथील ओझिल गेस्ट हाऊस येथे राहणा-या सर्गीस व्हिक्टर मानका (३१), स्टॅनी मुलर सेबॅस्तीयान (२५) या जर्मन नागरिकांकडून ६४ ग्रॅम एलएसडी ड्रग्स जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ६४ लाख रुपये होते. कारवाई मंगळवारी पहाटे करण्यात आली.पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी माहिती देताना मागच्या चार दिवसापासून संशयीताकडे मोठ्या किमतीचा ड्रग्स आहे, अशी माहिती त्यांना मिळाली होती. मात्र त्या दोघांनी सी फॉर्म भरले नसल्याने ते नेमके कोणत्या गेस्ट हाऊसमध्ये उतरले आहेत याची माहिती मिळत नव्हती. पेडणे पोलीस कॉन्स्टेबल प्रेमनाथ सावळदेसाई यांनी दोघांचीही पूर्ण माहिती गोळा केली नंतर ही कारवाई करण्यात आली.संशयित कोठे राहतात याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर, उपनिरीक्षक सागर धाटकर, प्रसाद तुयेकर, प्रेमनाथ सावळदेसाई, संदीप गावडे, स्वप्नील शिरोडकर, अनिलकुमार पोळे, फोंडू गावस, शैलेश पार्सेकर, योगेश गावकर व ओमप्रकाश पाळळी या पथकाने सापळा रचून दोघांनाही रंगेहाथ पकडले. पोलिसांनी पंचासहीत झडती घेतली असता त्यांच्याकडे ६४ लाखाचा ड्रग्स सापडला. त्याशिवाय रोख रुपये २७५०० आयफोन व सॅमसंग मोबाइल जप्त करण्यात आले. पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे.पेडणे पोलिसांनी या वर्षात एकूण १३ ड्रग्स गुन्हे नोंद केले असून पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली एकूण ३ गुन्हे नोंदवले. पेडणे पोलिसांच्या इतिहासात ही सर्वात मोठी कारवाई आहे. दोघे जर्मन हरमल येथील ओझिल गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्य करून होते. त्याचे सी फॉर्म न भरल्याने घर मालकावर गुन्हा नोंदवला जाणार असल्याचे चोडणकर म्हणाले.
जर्मन नागरिकांकडून हरमल येथे ६४ लाखांचे एलएसडी ड्रग्स जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 7:27 PM