गोवा: बाबूशचे पुन्हा सांताक्रुझ चलो रे, आज कार्यालयाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 09:24 PM2017-12-02T21:24:03+5:302017-12-02T21:24:29+5:30

कधी काँग्रेस, कधी युगोडेपा तर कधी युजी पार्टीच्या तिकीटावर निवडणुका लढविणारे माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पुन्हा एकदा चलो सांताक्रुझ अशी घोषणा केली आहे.

Goa: Again, the inauguration of the office of Babush again, Santa Cruz, let's go | गोवा: बाबूशचे पुन्हा सांताक्रुझ चलो रे, आज कार्यालयाचे उद्घाटन

गोवा: बाबूशचे पुन्हा सांताक्रुझ चलो रे, आज कार्यालयाचे उद्घाटन

googlenewsNext

पणजी : कधी काँग्रेस, कधी युगोडेपा तर कधी युजी पार्टीच्या तिकीटावर निवडणुका लढविणारे माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पुन्हा एकदा चलो सांताक्रुझ अशी घोषणा केली आहे. पणजी मतदारसंघात कुठेच लुडबूड न करता मोन्सेरात यांनी पुन्हा सांताक्रुझ मतदारसंघातूनच आपले राजकीय भवितव्य नव्याने घडवायचे असे ठरविले आहे. रविवारी मोन्सेरात हे गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्यालय सांताक्रुझ येथे सुरू करत आहेत.
उद्घाटन सोहळा रविवारी सकाळी अकरा वाजता पार पडेल. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे. मोन्सेरात यांनी 2012 साली सांताक्रुझ मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती व ते जिंकले होते. नंतर त्यांची पक्षविरोधी कारवायांमुळे काँग्रेसमधून त्यावेळचे प्रदेशाध्यक्ष लुईङिान फालेरो यांनी हकालपट्टी केली होती. मोन्सेरात यांनी यापुढे चार वर्षानी होणारी विधानसभा निवडणूक ही गोवा फॉरवर्डच्या तिकीटावर सांताक्रुझमधूनच लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ताळगाव किंवा पणजीमधून ते लढणार नाहीत, असे त्यांच्या कार्यकत्र्यानी सांगितले. सांताक्रुझ- कालापुर रस्त्याला टेकून पूर्वी जिथे काँग्रेसचे कार्यालय होते, तिथेच गोवा फॉरवर्डचा नामफलक आज लावला जाणार आहे. मोन्सेरात यांनी सांताक्रुझची पंचायतही आपल्याकडे वळवली आहे.
 2007 साली मोन्सेरात यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांनी युगोडेपाच्या तिकीटावर सांताक्रुझमधून निवडणूक लढवली होती पण जेनिफर तिथे पराभूत झाल्या होत्या. मोन्सेरात यांनी 2क्17 सालची विधानसभा निवडणूक पणजी मतदारसंघातून युजी पार्टीच्या (युगोडेपा नव्हे) तिकीटावर लढवली पण ते पणजीत हरले. आता मोन्सेरात यांनी पणजीत सध्या तरी हस्तक्षेप करायचाच नाही असे ठरवले आहे. पणजी मतदारसंघाचे नेतृत्व सध्या मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे करत आहेत. मोन्सेरात यांना बक्षिस म्हणून भाजपकडून ग्रेटर पणजी ही नवी पीडीए दिली जाणार आहे. सांताक्रुझ मतदारसंघात काँग्रेसला शह देण्यासाठी गोवा फॉरवर्डला आणि भाजपलाही सांताक्रुझमध्ये बाबूशचा वापर करता येईल, अशी चर्चा भाजपच्या आतिल गोटात सुरू आहे. सांताक्रुझ मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या काँग्रेस पक्ष करत आहेत. टोनी फर्नाडिस हे तिथे काँग्रेसचे आमदार आहेत.
 

Web Title: Goa: Again, the inauguration of the office of Babush again, Santa Cruz, let's go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा