Goa Lok Sabha Election 2024: नेत्यांसोबत मतदारही पक्ष बदलतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2024 09:21 AM2024-03-24T09:21:19+5:302024-03-24T09:23:05+5:30

Goa Lok Sabha Election 2024: दक्षिण गोव्यात यावेळी लढत सोपी नाही, याचा अंदाज सर्वच राजकीय पक्षांना आलेला आहे.

goa lok sabha election 2024 do voters change parties along with leaders | Goa Lok Sabha Election 2024: नेत्यांसोबत मतदारही पक्ष बदलतात का?

Goa Lok Sabha Election 2024: नेत्यांसोबत मतदारही पक्ष बदलतात का?

- सद्‌गुरु पाटील

Goa Lok Sabha Election 2024: २००४ साली दक्षिण गोव्यात काँग्रेसची मते ५५ टक्के होती. भाजपची मते तेव्हा ३८ टक्के होती. २००९ साली काँग्रेसची मते घटली व ४७ टक्के झाली. भाजपची ४२ टक्क्यांपर्यंत वाढली. २०१४ साली काँग्रेसला ४१ टक्के मते मिळाली, तर भाजपची मते ४८ टक्के झाली. २०१९ साली भाजपची मते ३ टक्क्यांनी घटून ४५ टक्के झाली. याउलट काँग्रेसची मते ६ टक्क्यांनी वाहून ४७ टक्के झाली.

दक्षिण गोव्यात यावेळी लढत सोपी नाही, याचा अंदाज सर्वच राजकीय पक्षांना आलेला आहे. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजप निश्थित आहे. उत्तर गोव्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही मोठेसे टेन्शन घेत नाहीत. त्यांना दक्षिण गोव्याविषयी मात्र चिंता आहे. अथीत बहुतांश वजनदार नेते भाजपसोबत आहेत, दिगंबर कामत, रवी नाईक, संकल्प आमोणकर, आलेक्स सिक्वेरा, माविन गुदिन्हों, मगौपचे सुदिन ढवळीकार हे सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारासोबत आहेत. तरी देखील दक्षिण गोवा मतदारसंघाचा प्रोफाईल वेगळा आहे. 

काँग्रेसमधून नेते भाजपमध्ये गेले म्हणून नेत्यासोबत मतदारही पक्षांतर करत असतात काय, या प्रश्नाचे उत्तर यावेळी दक्षिण गोव्यातील निवडणुकीतून मिळणार आहे. आपण काँग्रेस पक्ष सोडला व भाजपची वाट धरली म्हणून आपल्या मतदारांनीही मोठ्या संख्येने भाजपला मते दिली, असे कामत, संकल्प, रती नाईक, आलेक्स वगैरे दाखवून देऊ शकतील काय? त्या अर्थाने यावेळी नेत्यांची व मतदारांचीही कसोटी आहे. दक्षिण गोव्यात अंडरकरंट्स आहेत. अर्थात दरवेळी ते असतातच, खिस्ती समाजाची मानसिक स्थिती, एसटी समाजाची स्थिती, दक्षिण गोव्यातील भंडारी समाज आणि पारंपरिक पद्धतीने भाजपला मत देत आलेले मतदार यांच्या मनाचा कल समजून घ्यावा लागेल आपल्याला योग्य उमेदवार हवा ही भाजप समर्थकांची भावना आहे. उगाच कुणीही उमेदवार म्हणून लादला तर आम्ही तो स्वीकारायचा का असे विचारणारे भाजप समर्थकही सापडतात. 

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी फ्रान्सिस सार्दिन का जिंकले सादिनच्या प्रेमापोटी ते मतदान झाले नव्हते. भाजप नको या हेतूनेही त्यावेळी काही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या बाजूने मतदान झाले होते. केवळ सुदिन ढवळीकर यांच्यामुळे त्यावेळी भाजपचा पराभव झाला किंवा काँग्रेसचा विजय झाला होता, असे म्हणताच येत नाही. ते एकटे कुणाचा पराभव घडवून आणू शकतील, एवढे ढवळीकर मोठे नेते नाहीत, केवळ त्यांनी पराभवास थोड़ा हातभार लावला होता. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिण गोव्यात हिंदू मतेही खूप फुटली होती. सार्दिन केवळ अल्पसंख्यांकांच्या मतांवर निवडून आले नव्हते. त्यांना हिंदू मतेदेखील प्राप्त झाली होती. यावेळी हिंदू मतांपैकी बहुतांश मते भाजपला जातील काय? किंवा बिस्ती व मुस्लिम धर्मियांची मते फुटतील कस्य, त्याचा लाभ भाजपला होईल काय या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी अजून दोन अडिच महिने थांबाचे लागेल.

संकल्प आमोणकर किंवा स्वी नाईक यांच्या मतदारसंघांमध्ये हिंदू व मुस्लिम मतदारही संख्येने बऱ्यापैकी आहेत. नावेली मतदारसंघातही मुस्लिम व ख्रिस्ती मतदार आहेत. मडगाव मतदारसंघातही आहेत संकल्प, रवी, दिगंबर कामत वगैरे आता भाजपमध्ये आहेत, याचा परिणाम या मतदारांवर होईल काय? नावेली मतदारसंघ यावेळी प्रथमच भाजपकडे आहे. याचा लाभ भाजपला मिळेल काय हेही पहावे लागेल. सासष्टी तालुक्यात गेल्यावेळी फ्रान्सिस सार्दिन यांना मोठी आघाडी मिळाली होती. यावेळी काँग्रेस पक्ष कुणाला तिकीट देतो तेही पहावे लागेल. मतदार त्यावरूनही बरेच काही ठरवतील. 

आलेक्स सिक्वेरा हे नुवेचे आमदार आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करून मंत्री झाले आहेत. जे बिस्ती मतदार एरव्ही आलेक्सना मते देतात ते आता लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला मते देतील काय? मडगाव मतदारसंघातील जे अल्पसंख्याक मतदार एरव्ही दिगंबर कामत यांना मते देतात ते आता लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या पारड्यात मते टाकतील काय? समजा नेत्यांसोचत मतदारांची भूमिका बदलू लागली तर मग नेत्यांसोबत मतेही शिफ्ट होतात किंवा ट्रान्सफर होतात असे म्हणावे लागेल, काही विधानसभा मतदारसंघात मते ट्रान्सफर होत असतात, पण काही ठिकाणी होत नाहीत. 

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी केप्यात मते शिफ्ट झाली नाहीत, मते ट्रान्सफर झाली नाहीत, त्यामुळे बाबू कवलेकर यांचा पराभव झाला. एरव्ही सातत्याने काँग्रेसच्या तिकिटावर जिंकणारे कवळेकर भाजपच्या तिकिटावर मात्र पराभूत झाले, सांताक्रूझमध्ये टोनी किंवा सांतआंद्रेत फ्रान्सिक सिल्वेरा पराभूत झाले, तिथे नेत्यांसोबत मतदार बदलले नाहीत मात्र बाबूरा मौन्सेरात किंवा विश्वजित राणे यांच्यासारखे नेते ज्या पक्षाच्या तिकिटावर उभे राहतात, त्या पक्षाच्या चिन्हावर मतदार मत देत असतात. त्या नेत्यांकडून मते आपल्याला हव्या त्या पक्षाकडे ट्रान्सफर केली जातात, रवी नाईक फाँड्यात काँग्रेसतर्फेही
जिंकतात व भाजपच्या तिकिटावरही जिंकतात. शिरोड्यात सुभाष शिरोडकरांबाबतही तसेच म्हणता येते. ते काँग्रेसच्या व भाजपच्याही तिकिटावर यश प्राप्त करतात. अर्थात विधानसभा निवडणुकीवेळची गणिते वेगळी व लोकसभा निवडणुकीवेळची गणिते वेगळी असतात, हेही तेवढेच खरे.

काँग्रेस व आप यांच्यात युती झालेली आहे. इंडिया आघाडीच्या छत्राखाली दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे दक्षिण गोवा मतदारसंघातील लढतीत थोडा रंग असेल. मुख्यमंत्री सावंत यांनी दक्षिणेवर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. कारण आपल्याच पक्षातील काही नेत्यांवर तसा त्यांचा पूर्ण विश्वास नसावा, काही नेते स्वतःच्या निवडणुकीवेळी तन-मन-धन अर्पून काम करतात, पण लोकसभा निवडणुकीवेळी ते नेते तेवढा घाम गाळत नाहीत, याची मुख्यमंत्र्यांनाही कल्पना असेलच. 

काँग्रेस पक्ष संघटना ही भाजपच्या तुलनेत कमकुवत आहे. शिवाय दक्षिण गोव्यातील मतदारांनी पूर्वी दोनवेळा (एकदा सावईकर व एकदा रमाकांत आंगलेच्या रुपात) भाजपला निवडून दिलेले आहे. दक्षिणेचे मतदार भाजपला मत देऊन विजयीही करत असतात, हे सिद्ध झालेले आहे. शिवाय सांगे, सावर्डे, कुडचडे अशा हिंदुबहुल विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला खूप मोठ्या प्रमाणात मते मिळत असतात.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जरी नीलेश काब्राल यांना कमी मते मिळाली तरी, आता लोकसभा निवडणूकीवेळीही तसेच घडेल असे मुळीच म्हणता येत नाही. खाणपट्ट्यातील मतदार है अजून भाजपसोबत आहेत, यावेळी काँग्रेस पक्ष कोणता उमेदवार देईल, ते लोक पाहतील आणि त्यानुसार मत कुणाला द्यावे हे ठरवतील. केंद्रातील भाजप सरकार मजबूत आहेच. भाजपच्या प्रचाराला यावेळी दक्षिणेत अधिक जऔर असेल. तरी देखील भाजपसाठी कसोटी आहे आणि काँग्रेसची तर त्याहून मोठी परीक्षा आहे. एसटी मतदारांनाही कुणीच गृहीत धरू शकणार नाही. सासष्टीसह दक्षिण गोव्यात एसटी मतदारांचीही संख्या लक्षणीय आहे. त्यांची मते यावेळी कसकशी फिरतात ते काणकोणपासून कुडतरीपर्यंतचा अभ्यास करून पहावे लागेल

 

Web Title: goa lok sabha election 2024 do voters change parties along with leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.