गोव्याचे पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांना धमकी प्रकरणात एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 10:26 PM2020-11-08T22:26:22+5:302020-11-08T22:26:59+5:30

याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी मुरगावचे पोलीस उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांना संपर्क केला असता रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास वेर्णा पोलीसांनी जयेश फडते नावाच्या इसमाला अटक केल्याचे सांगितले.

Goa Panchayat Minister Mavin Gudinho arrested in threat case | गोव्याचे पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांना धमकी प्रकरणात एकास अटक

गोव्याचे पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांना धमकी प्रकरणात एकास अटक

Next

वास्को - गोव्याचे पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांना मोबाईलवर संदेश (मेसेज) पाठवून धमकी देणाºया प्रकरणात वेर्णा पोलीसांनी रविवारी (दि ८) रात्री शिंदोळी, साकवाळ येथे राहणाऱ्या जयेश फडते नावाच्या इसमाला अटक केली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच इतर काहींना मागच्या दिवसात मोबाईलवर संदेश पाठवून धमक्या देण्यात आलेल्या असून याप्रकरणातही जयेश याचा हात आहे काय याबाबत पोलीस चौकशी करणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली.

याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी मुरगावचे पोलीस उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांना संपर्क केला असता रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास वेर्णा पोलीसांनी जयेश फडते नावाच्या इसमाला अटक केल्याचे सांगितले. पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांना मागच्या काही दिवसापासून मोठी रक्कम देण्याबाबत धमकीचे संदेश मोबाईलवर अज्ञाताकडून पाठवण्यात येत होते. संदेश पाठवण्यात येणारा मोबाईल क्रमांक अंतरराष्ट्रीय असल्याची माहीती पोलीसांनी पुढे दिली. धमकी देण्यात येणाºया संदेशाखाली जयेश फडते असे नाव व एक स्थायी मोबाईल क्रमांक लिहून त्याच्यावर संपर्क करण्याबाबत बजावण्यात येत होते. याप्रकरणात पोलीसांनी चौकशी करण्यास सुरवात केली असता शिंदोळी, साकवाळ येथे राहणाºया जयेश फडते यांच्यावर दाट संशय निर्माण झाल्याने पोलीसांनी त्याला अटक केली असून याप्रकरणात त्याच्याशी कसून चौकशी चालू आहे. पंचायतमंत्री गुदिन्हो यांना धमकी देण्याच्या प्रकरणात अटक केलेल्या जयेश फडते याचाच मुख्यमंत्री व इतरांना मोबाईलवर संदेश पाठवून धमकी देण्याच्या प्रकरणात हात आहे काय याबाबतही पोलीस चौकशी करणार असल्याचे समजते.

२ ऑक्टोंबरपासून मला येत होत्या धमक्या देणारे संदेश

गोव्याचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांना माहीती घेण्यासाठी संर्पक केला असता मला २ आॅक्टोंबरपासून सलग मोबाईलवर संदेश पाठवून धमकी देण्याच्या प्रकाराला सुरवात झाल्याची माहीती त्यांनी दिली. सुरवातीला हा प्रकार चेष्टा असावा असे मी गृहीत धरले, मात्र नंतर हा प्रकार अतीवर येऊन पोचला. धमकी देणाऱ्याने सुरुवातीला ‘मला ५० लाख रुपये दे अन्यथा मी तुझ्या बहीणीला ठार मारणार’ अशा प्रकारच्या धमक्या देण्यास सुरू केले. नंतर धमकी देण्याच्या तीव्रतेत आणखीन वाढ होण्यास सुरवात झाल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले. 

मला येणाऱ्या ह्या धमकी मराठी व कोकणी अशा भाषेत असायच्या असे गुदिन्हो यांनी पुढे सांगितले. पैशांची मागणी करत धमकी देणारा तो व्यक्ती एका इसमाला संपर्क कर असे संदेशात टाकत होता. ७ नोव्हेंबर रोजी मला धमकी देणारा शेवटचा संदेश आलेला असून यात ‘जर तुम्ही मला १ कोटी रुपये दिले नसल्यास मी तुम्हाला ठार मारणार’ अशी धमकी त्यांने दिल्याची माहीती गुदिन्हो यांनी दिली. मला धमकी देणाºया प्रकरणात अटक केलेल्या त्या व्यक्तीचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत व इतरांना धमकी देणाºया प्रकरणात सुद्धा हात असू शकतो असा संशय पंचायतमंत्री गुदिन्हो यांनी त्यांच्याशी चर्चा करताना व्यक्त केला. 
 

Web Title: Goa Panchayat Minister Mavin Gudinho arrested in threat case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.