नाताळासाठी गोवा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:28 PM2019-12-24T12:28:26+5:302019-12-24T12:28:33+5:30
उद्या २५ डिसेंबर रोजी जगभर साजरा होणाऱ्या नाताळ सणाची पूर्वतयारी गोवाभर पूर्ण झाली आहे.
म्हापसा : नाताळ सणाच्या स्वागतासाठी पूर्ण गोवा सज्ज झाला आहे. गावात, शहरात नाताळाचे वातावरण तयार झाले आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्माची त्याच्या स्वागताची तयारी सर्वत्र पूर्ण झाली आहे. आता फक्त प्रतिक्षा लागून राहिली आहे ती मध्यरात्री होणाºया प्रार्थना सभाची. सणा निमित्त देश-विदेशातून पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.
उद्या २५ डिसेंबर रोजी जगभर साजरा होणाºया नाताळ सणाची पूर्वतयारी गोवाभर पूर्ण झाली आहे. सणाचा माहोल सर्वत्र तयार झाला आहे. सणाचे प्रतिक असलेल्या आकर्षक विविध प्रकाराच्या आकाराच्या पारंपारिक नक्षत्रांच्या सजावटीतून परिसर फुलून गेला आहे. गोठ्यात जन्म घेतलेल्या येशू ख्रिस्ताच्या गोठ्याचे आकर्षक असे देखावे सर्वत्र तयार करण्यात आले आहेत. जागोजागी करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने गावे, शहरे न्हावून गेली आहेत. मध्यरात्री होणाºया प्रार्थना सभांची तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे. प्रत्येकगावातील शहरातील चर्चीत प्रार्थना सभांचे आयोजन सणानिमित्त केले जाते. संबंधीत चर्चीतील धर्मगुरूंच्या (पाद्री) मार्गदर्शनाखाली प्रार्थना सभांचे आयोजन केले जाते. प्रार्थना सभांच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक नृत्याच्या कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. नाताळाच्या दिवसापासून ते नवीन वर्षापर्यंत चर्चच्या परिसरात भरगच्च असे विविध प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा केले जातात. नाताळाच्या दिवशी सांताक्लॉजचे आगमन सर्वत्र होते.
नाताळातील वातावरण निर्मितीचा एक भाग म्हणून प्रत्येक गावातील वाड्यावरुन दर दिवशी कॅरल संगीताच्या धुनीने मिरवणुकी काढण्यात आलेल्या. या मिरवणुकीत लहानांपासून ते जेष्ठापर्यंत सहभागी झाले होते. डोक्यावर लाल रंगाच्या टोप्या, हातात कंदील व तोंडात कॅरल गीतांचे स्वर असे त्याचे स्वरुप असते. मिरवणुकीच्या अग्रस्थानाचा मान चर्चेच्या पाद्रींना देण्यात आलेला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या मिरवणुका काढल्या जातात.
एकात्मतेचे प्रतीक असलेल्या समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रीत आणणारा, धार्मिक एकात्मतेबरोबर एकमेकांशी असलेले सलोख्याचे नाते हीतसंबंध ऋणानुबंध जपणाºया या नाताळ समा निमित्त नक्षत्रांच्या स्पर्धा, गोठ्यांच्या स्पर्धा ख्रिसमस ट्री तसेच कॅरोल गीत गायनांच्या स्पर्धा सुद्धा भरवल्या जातात. आकर्षक बक्षिसे दिली जातात. या सणाचे हे विशेष असे आकर्षण सुद्धा असते. सणाला लागणारे विविध पदार्थ खास करुन करंजा, बिबींक, धोदोल सारखे पदार्थ घरा घरातून बनवण्यात आले आहेत.