मोदींच्या स्वागतासाठी गोवा सज्ज, वाहतुकीत बदल; मुख्यमंत्र्यांकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर
By समीर नाईक | Published: October 24, 2023 04:20 PM2023-10-24T16:20:17+5:302023-10-24T16:21:30+5:30
फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर सदर उद्घाटन सोहळा होणार आहे
पणजी: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनला २६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात येणार आहे, या अनुषंगाने वाहतुकीस बदल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या स्वागताची इतर तयारी देखील जोरात सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मंगळवारी पर्वरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत क्रीडामंत्री गोविंद गावडे, क्रीडा सचिव स्वेतिका सच्चेन, पोलिस महा संचालक जसपाल सिंग, व इतर पदाधिकारी उपस्थित.
फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर सदर उद्घाटन सोहळा होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खास निमत्रक पत्रिकेचे आमदार, पंचायत यांच्यामार्फत वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार सर्वांनी सायंकाळी ४.३० पूर्वी स्टेडियममध्ये हजर राहणे आवश्यक आहे. यानंतर पोहचलेल्यांना स्टेडियममध्ये येणे कठीण होईल, असे डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
कोलवा जंक्शन ते टायटन जंक्शन मार्ग अर्धातास बंद
पंतप्रधान राज्यात येत असल्याने सुरक्षतेच्या दृष्टीने आम्हाला काही प्रोटोकॉल पाळावे लागणार आहे. याच प्रोटोकॉलमुळे वाहतुकीस बदल करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता कोलवा जंक्शन ते टायटन जंक्शन अर्धातास बंद ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी ट्रॅफिक होऊ नये यासाठी २६ रोजी दक्षिणेतील सरकारी कर्यांलयाना अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
१२ हजार लोकांची उपस्थिती
या कार्यक्रमाला राज्यभरातून सुमारे १२ हजार लोक उपस्थित राहणार आहे. तर यातील ५ हजार हे शालेय विद्यार्थी असणार आहे. तसेच या व्यतरिक्त सहभागी खेळाडू व इतर पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.
६०० कलाकारांचे पंतप्रधान समोर सादरीकरण
देशभरातील ६०० कलाकारांचे यावेळी पंतप्रधान समोर सादरीकरण होणार आहे..यामध्ये २०० गोमंतकीय खेळाडू आहेत. तसेच हेमा सरदेसाई आणि सुखविंदर सिंग यांचाही खास कार्यक्रम होणार आहे.
कात्या कोएल्होला ज्योत रीलेचा मान
भालाफेक मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता, तथा गोल्डन बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला नीरज चोप्रा हे पंतप्रधान यांना ज्योत सुपूर्द करणार असे निश्चित करण्यात येत होते, परंतु गोवा सरकारकडून सेलर कात्या कोएल्होचे नाव पुढे काढण्यात आले आहे, त्यामुळे चोप्रा सोबत कात्या कोएल्हो देखील स्पर्धेची ज्योत पंतप्रधान मोदी यांना सुपूर्द करताना दिसू शकणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.