Goa: सलग दुसऱ्या दिवशी स्मार्ट सिटीच्या रस्त्यावर रुतला ट्रक, महिन्यातील तिसरी घटना
By समीर नाईक | Published: February 27, 2024 05:03 PM2024-02-27T17:03:37+5:302024-02-27T17:04:13+5:30
Goa News: स्मार्ट सिटीची कामे पणजीवासियांना व वाहन चालकांना डोकेदुखी ठरत आहे. मंगळवारी करंझाळे येथे स्मार्ट सिटीच्या खड्ड्यात आणखी एक ट्रक रुतला. लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या या ट्रकचे चाक अचानक रस्ता खचून आता गेल्याने, स्मार्ट सिटीच्या बेशिस्त काम पुन्हा एकदा उघड्यावर पडले आहे.
- समीर नाईक
पणजी - स्मार्ट सिटीची कामे पणजीवासियांना व वाहन चालकांना डोकेदुखी ठरत आहे. मंगळवारी करंझाळे येथे स्मार्ट सिटीच्या खड्ड्यात आणखी एक ट्रक रुतला. लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या या ट्रकचे चाक अचानक रस्ता खचून आता गेल्याने, स्मार्ट सिटीच्या बेशिस्त काम पुन्हा एकदा उघड्यावर पडले आहे.
करंझाळे येथील रुतलेल्या ट्रकमुळे या भागात काहीफार प्रमाणात ट्रॅफिकची समस्या उद्भवली होती. पण थोड्यावेळा नंतर हा ट्रक बाहेर काढण्यात आला. पण आता अवजड वाहने स्मार्ट सिटीत आणताना चालकांपुढे मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पणजीत जे काही काम यापूर्वी झाले आहे, ते अत्यंत कमी दर्जाचे काम आहे. अनेक रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले खरे, पण रस्त्या करताना पाया घट्ट करण्यात आलेला नाही. अनेक खड्डे हे केवळ रेती घालून बुजविण्यात आले आहे, त्यामुळे ट्रक रूतण्यासारखी घटना होत आहेत. स्मार्ट सिटीचे प्रशासन किंवा महानगरपालिका देखील याबाबत गंभीर नसून, कंत्राटदारांची मनमानी पणजीत सुरू आहे, असा आरोप लोक करताना दिसतात.
सोमवारीच एक ट्रक आझाद मैदान जवळील परिसरात अचानक रस्ता खचून रुतला होता. गेल्या दोन दिवसात दोन ट्रक स्मार्ट सिटीच्या रस्त्यात रुतले आहेत. तर फेब्रुवारी महिन्यातील ट्रक रस्त्यात रुतण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे लोकांनी देखील संताप व्यक्त केला आहे.