सिक्कीममध्ये गोव्याची अनुराची ‘गोल्डन’ चमक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 02:41 AM2017-12-10T02:41:43+5:302017-12-10T02:42:04+5:30

गोव्याची अव्वल मानांकित बॅडमिंटन स्टार अनुरा प्रभुदेसाई हिने सिक्कीम येथील अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन स्पर्धेत एकेरीत सुवर्णपदक आणि दुहेरीत रौप्यपदक पटकाविले.

Goa's Anurachi 'golden' glow in Sikkim | सिक्कीममध्ये गोव्याची अनुराची ‘गोल्डन’ चमक!

सिक्कीममध्ये गोव्याची अनुराची ‘गोल्डन’ चमक!

Next

पणजी : गोव्याची अव्वल मानांकित बॅडमिंटन स्टार अनुरा प्रभुदेसाई हिने सिक्कीम येथील अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन स्पर्धेत एकेरीत सुवर्णपदक आणि दुहेरीत रौप्यपदक पटकाविले. एकेरीतील अंतिम फेरीत अनुराने वैष्णवी भाले हिचा २१-१६, १८-२१, २१-१९ अशा गुणफरकाने पराभव केला. दुहेरीत अनुरा-वैष्णवी भाले या जोडीला मात्र धन्या नायर-अश्ना रॉय या जोडीकडून २१-१८, १७-२१, १७-२१ ने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना रौप्यपदक प्राप्त झाले. 
बॅडमिंटन असोसिएशन आॅफ इडियाने आयोजित केलेली ही स्पर्धा ४ ते ९ डिसेंबर दरम्यान खेळविण्यात आली. भारतीय बॅडमिंटन मानांकनात महिला एकेरीत अव्वल स्थानावर असलेल्या गोव्याच्या अनुराने या स्पर्धेतही अव्वल मानांकन मिळवले होते. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अनुराने श्रुती मंदादार हिचा २१-१३, २१-१७ ने पराभव केला होता. दुहेरीत, अनुराने वैष्णवीसोबत खेळताना अग्ना अंतो-स्नेहा सांथीलाल या जोडीचा २१-१७, २१-१४ ने पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. एकेरीतील पाचही सामने जिंकत अनुराने छाप सोडली.

Web Title: Goa's Anurachi 'golden' glow in Sikkim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे