भाटले येथे गोदामाला आग, अंदाजे अडीच लाखाचे नुकसान
By समीर नाईक | Published: March 23, 2024 04:21 PM2024-03-23T16:21:23+5:302024-03-23T16:21:40+5:30
एका रेसिडेंशल कॉलनी खाली असलेल्या या गोदामाला दुपारी १२.३० च्या सुमारास ही आग लागली होती.
पणजी: भाटले येथील टायनी टॉईज विद्यालय जवळील एका पेंटाच्या दुकानाच्या गोदामाला शनिवारी आग लागली. बंद गोदामातून धूर बाहेर येत असल्याचे पाहून तेथील रहिवाशीनी अग्निशामक दलाशी संपर्क साधला. दलाने त्वरित घटनास्थळी पोहचत आग आटोक्यात आणली.
एका रेसिडेंशल कॉलनी खाली असलेल्या या गोदामाला दुपारी १२.३० च्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहचत आग आटोक्यात आणली पण तरीही या गोदामातील अनेक सामान जळून खाक झाले होते. या आगीमुळे अंदाजे अडीच लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे दलाचे अधिकारी सांगतात. पण या पेक्षा जास्तही नुकसान होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
या गोदामात सकाळी दिवा लावल्यानंतर हे गोदाम बंद करण्यात आले होते. बहूतेक पेटत असलेल्या दिव्याच्या वातीमुळे ही आग लागल्याचा अंदाज अग्निशामक दलातर्फे व्यक्त करण्यात येत आहे. एका तासाच्या आत ही आग पूर्णपणे अग्निशामक दलाने नियंत्रणात आणली. दलाने अग्निशामक दलातर्फे पणजी स्टेशन फायर अधिकारी रुपेश सावंत, हवालदार किशोर सातार्डेकर व इतर फायर फायटर्स घटनास्थळी उपस्थित होते.