देशाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे मोठे योगदान; लोकोत्सवातून गोमंतकीय संस्कृती जतनाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2024 10:42 AM2024-12-09T10:42:23+5:302024-12-09T10:44:51+5:30

आमोणे-पैंगीण येथील लोकोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना इदाते हे बोलत होते.

great contribution of the tribal community in the formation of the country the work of preserving gomantiya culture through Lokotsav | देशाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे मोठे योगदान; लोकोत्सवातून गोमंतकीय संस्कृती जतनाचे काम

देशाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे मोठे योगदान; लोकोत्सवातून गोमंतकीय संस्कृती जतनाचे काम

लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण : देशाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती आहेत तर तवडकर गोव्यात विधानसभेचे सभापती आहेत ही आदिवासी समाजाला अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन भटके विमुक्त जाती जमातीचे आयोगाचे माजी अध्यक्ष दादा इदाते यांनी केले.

आमोणे-पैंगीण येथील लोकोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना इदाते हे बोलत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर सभापती रमेश तवडकर, पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, आमदार कार्लस फेरेरा, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, ट्रायफेडचे रामसिंग राठवा, बलराम शिक्षण संस्थेचे अंकुश गावकर, सरपंच सविता तवडकर, वृंदा वेळीप, निशा च्यारी, सेजल गावकर, उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर, मुख्याधिकारी रमेश गावकर, भाजपा मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, अशोक गावकर, जानू तवडकर, एससी, एसटी कमिशनर दीपक करमळकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष संजना वेळीप आदी उपस्थित होते.

इदाते म्हणाले की, 'केवळ भाषणबाजीने परिवर्तन होत नाही, कृती हवी. नरेंद्र मोदींमुळे देशात परिवर्तन होत आहे.. देशाला १९४७ला नव्हे तर खऱ्या अर्थाने २०१४ला स्वातंत्र्य झाला. देशात १९१८ पासून धर्म व संस्कृती संपुष्टात आणण्याचे षड्यंत्र सुरू आहे. मात्र, संस्कृती रक्षणाचे कार्य तवडकर करीत आहेत. त्यामुळे त्यांना लोकनायक व लोकनेते म्हटले पाहिजे. सामान्य व्यक्तींना मोठे करण्याची त्यांची तळमळ ही वाखाणण्यासारखी आहे.'

आमदार दिगंबर कामत म्हणाले की, 'शिक्षणामुळे क्रांती घडते व ती क्रांती घडविण्याचे कार्य त्यांनी केली आहे. जे अशक्य ते शक्य करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. काणकोण तालुका देशातील मॉडेल तालुका व्हावा, अशी अपेक्षा आहे. राम सिंग राठवा यांनी जीवनात पुढे पाऊल मारण्याची प्रेरणा लोकोत्सवातून मिळते.'

व्यासपीठावरील मान्यवरांकडून श्रद्धा शिरोडकर, आश्विनी गावकर, लीना कुट्टीकर, विन्सी काढूश, महेंद्र नाईक, उगम जांबावलीकर, जयंत मिरिंगकर, शलाका कांबळे, उषा मयेकर, जयेश सिंगबाळ, विनायक नाईक यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कोकणी मराठी साहित्य सृजनोत्सवाच्या व्यासपीठावर कविता आमोणकर यांचा गगनभरारी पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. साहित्यिक कविता आमोणकर, जयंती नाईक, डॉ. प्रमदा देसाई, प्रकाश तळवडेकर, उदय म्हांबरे, दत्ताराम पाडलोस्कर, सोनाली पेडणेकर, दिलीप बोरकर, कालिका बापट, कमलाकर म्हाळशी यांचा सत्कार करण्यात आला. कल्पिता नाईक यांनी सूत्रसंचालन केले. दामोदर वेळीप यांनी आभार मानले.

संस्कृतीची कास हवी 

सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले की, गावचा विकास करण्याकरिता संस्कृतीची कास धरणे गरजेचे आहे. गावपण, माणुसकी सांभाळायला हवी. समृद्ध काणकोणचे मी स्वप्न पाहिले आहे. त्याकरिताच माझी धावपळ सुरू आहे. बीच संस्कृती ही गोमंतकीय संस्कृती नव्हे. गोव्याची खरी संस्कृती ग्रामीण भागात आहे.
 

Web Title: great contribution of the tribal community in the formation of the country the work of preserving gomantiya culture through Lokotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा