वैविध्यपूर्ण वारशाचा सन्मानसोहळा; साळगाव येथे गोवा हेरिटेज फेस्टिव्हलला प्रतिसाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 11:37 AM2023-04-30T11:37:17+5:302023-04-30T11:37:59+5:30

सांस्कृतिक वारशाच्या पैलूंचे प्रदर्शन.

honoring diverse heritage response to goa heritage festival at salgaon | वैविध्यपूर्ण वारशाचा सन्मानसोहळा; साळगाव येथे गोवा हेरिटेज फेस्टिव्हलला प्रतिसाद 

वैविध्यपूर्ण वारशाचा सन्मानसोहळा; साळगाव येथे गोवा हेरिटेज फेस्टिव्हलला प्रतिसाद 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : साळगाव येथे सुरू असलेल्या गोवा हेरिटेज फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी विविध सांस्कृतिक उपक्रम आणि कार्यक्रम पार पडले. यातील प्रमुख आकर्षण ठरला तो कोंकणी सिनेमा 'आमचे नोशिब'. त्याचबरोबर स्थानिक आमदारांच्या सहकार्याने आयोजित पाककला स्पर्धेनेही दिवसभराची रंगत वाढवली.

या महोत्सवामध्ये भांगराळे गोंय हा निमशास्त्रीय कार्यक्रमही आयोजित केला होता. या कार्यक्रमात गोमंतकीय लोक जीवनशैली, तसेच संस्कृतीचे दर्शन डॉ. पूर्णानंद च्यारी यांनी सांगीतिक स्वरूपात सादर केली आहे. तसेच नामांकित गायिका लोर्ना आणि त्यांच्या समूहाचा आणि इम्पेरियल बँडने सादर केलेल्या संगीत कार्यक्रमाने दिवसाच्या आनंदास कळस चढविला. एकूणच या महोत्सवातून गोव्यातील श्रीमंत संस्कृती आणि वारशाबाबत वैविध्यपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

खाद्यपदार्थांची खवय्यांना पर्वणी ३६ दालने, या महोत्सवात वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात आले. यामध्ये अस्सल गोमंतकीय पाककला संस्कृतीतील विविध खाद्यपदार्थ, पेय पदार्थांची ३६ दालने, संस्मरणीय अशी खाद्यभ्रमंती. तसेच काजू फेणी निर्मितीचे प्रात्यक्षिकही प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच विविध कारागिरी उत्पादनांची दालनेही गोव्यातील श्रीमंत, वैविध्यपूर्ण परंपरांचे दर्शन घडवत आहेत. गोमंतकीय पारंपरिक लोकनृत्यांचे कार्यक्रम महोत्सवास आनंदमय झालर लावत आहे.

फॅन्सी ड्रेस स्पर्धा, चित्रपट प्रदर्शन आज

- महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीही म्हणजे रविवारी, विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. यामध्ये मोग आनी मोयपास हा कोंकणी तर 'श्यामची आई' हा मराठी चित्रपट दाखवला जाणार आहे.
- पाच ते १५ वर्षे वयोगटातील मुलामु- लींसाठी खास गोमंतकीय पोषाखावि- षयक फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
- नाट्यगीत, भावगीत, मराठी-कोंकणी कांतारा, निम शास्त्रीय गीते अशी सुरेख व चौरस संगीत मेजवानीही सादर होणार आहे.
- दिव्या नाईक यांचा मांडो आणि धालो नृत्याचा कार्यक्रमही होणार आहे.
- शाइन ऑन आणि क्लिक्स हे बँडही आपली संगीतकला सादर करणार आहेत.

कलाप्रकारांना प्रोत्साहन

राज्यातील श्रीमंत सांस्कृतिक व वैविध्यपूर्ण वारशाचा सन्मान सोहळा म्हणजे गोवा हेरिटेज फेस्टिवल होय. संगीत, नृत्य, पाककला, हस्तकला, कारागिरी असे विविध पारंपरिक कलाप्रकार या महोत्सवामधून आपली पंरपरा, वैशिष्ट्ये सादर करत आहेत. गोवा पर्यटन विभागाद्वारे साळगाव येथे आयोजित हा उपक्रम ३० एप्रिलपर्यंत चालणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: honoring diverse heritage response to goa heritage festival at salgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा