बाळाचा मृतदेह बॅगेत कसा कोंबला; सूचनाने 'कृत्य' दाखवले; कळंगुट पोलिसांकडून 'सीन रिक्रिएट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 07:42 AM2024-01-13T07:42:09+5:302024-01-13T07:43:37+5:30
खून आपण केला नसल्यावर निर्दयी सूचना ठाम.
लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : निर्दयी सीईओ मातेने चार वर्षाच्या कोवळ्या मुलाची हत्या करून मृतदेह बॅगेत कसा कोंबला व त्यानंतर आत्महत्या करण्यासाठी कटरने आपल्या हाताची नस कापण्याचा कसा प्रयत्न केला याचे प्रात्यक्षिक कळंगुट पोलिसांना घटनास्थळी दाखविले.
सिकेरी येथील हॉटेलच्या ज्या खोलीत मुलाची हत्या तिने केल्याचा आरोप आहे, त्या खोलीत नव्याने 'क्राइम सीन' उभा करण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी तिला खोलीत नेले व घटनाक्रम कथन करण्यास, तसेच मृतदेह बॅगेत कसा ठेवला हे प्रत्यक्ष करून दाखविण्यास सांगितले. या सर्व गोष्टी तिने करून दाखवल्या, एवढे करूनही ती आपण मुलाचा खून केलेला नाही, असा दावा करीत आहे.
ज्या खोलीत ती राहत होती त्या खोलीत गेल्यानंतर तिने घटनाक्रमाची माहिती पोलिसांना दिली. स्वतः हात कापण्यासाठी कात्रीचा कशा पद्धतीने वापर केला याची माहिती दिली. जमिनीवर पडलेले रक्ताचे डाग कशा पद्धतीने साफ केले हेही सांगितले. त्यानंतर मृत्यू झालेल्या आपल्या बाळाला कशा पद्धतीने बॅगेत घातले याचेही प्रात्यक्षिक दाखविले. मात्र, बाळाचा आपण खून केला नसल्याच्या आपल्या भूमिकेवर ती कायम राहिली, दरम्यान, चिन्मयचा व्हिद्वारा गुरुवारी कळंगुट पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविला आहे. चित्रदुर्ग येथे शवचिकित्सा झाल्यानंतर बाळाचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता.
शवचिकित्सेत चिन्मयाचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाल्याचे नमूद करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपर्यंत सूचनाने हॉटेलमध्ये पुन्हा जाण्यास नकार दर्शविला होता. आपण त्याचा खून केला नसून झोपेतच मुलाचा मृत्यू झाल्याच्या दाव्यावर ती कायम राहिली होती. त्यामुळे तपासकार्यात तिचे सहकार्य लाभावे यासाठी तिचे मन वळविण्यास सर्वतोपरी प्रयत्न शुक्रवारी सकाळी सुरू करण्यात आले होते.
चौकशीसाठी पती आज गोव्यात
निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सूचनाच्या उलट तपासणीला सुरुवात करण्यात आली. हॉटेलमध्ये कशा प्रकारे खून केला है दाखविण्यास दीड तासाचा कालावधी पोलिसांना लागला, आता सूचनाचा पती व्यंकटरमण वाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले असून, तो आज, शनिवारी कळंगुट पोलिस ठाण्यात दाखल होणार आहे.
बॅगेत खेळण्यांमध्ये होता चिन्मयचा मृतदेह!
बॅगेत कोंबलेला मृतदेह कोणालाही दिसू नये यासाठी तिनं मृतदेहावर खेळणी तेवली होती, असेही उघड झाले आहे. पोलिसांकडे अजूनही तिने आपणच मुलाची हत्या केल्याची कबुली दिलेली नाही. मुलाचा मृत्यू झोपेतच झाल्याचा व सकाळी मला ते समजल्याचा बनाव ती करत आहे. काल सिकेरी येथील हॉटेलमधील त्या खोलीत तिला तपासासाठी नेले असताही तिने पोलिसांना फारसे सहकार्य केले नाही.
पाच ओळींचाच मजकूर!
टिश्यू पेपरवर घाईघाईत तिने मजकूर लिहिला असावा. कारण तो फक्त पाच ओळीचाच आहे. मुलाचा ताबा आपण कोणाकडेही देणार नाही, असे तिने लिहिले आहे. मुलाची हत्या केल्यानंतर तिने ही चिड्री लिहिली असावी, असा पोलिसांचा तार्क आहे. ही चिठ्ठीच तपासात महत्त्वाचा दुवा ठरला आहे. अटक केल्यानंतर सूचना हिची मानसिक तपासणीही केली. पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी ९० दिवसांची मुदत आहे.
मोबाइलवर ६ हजार फोटो
सूचना हिच्या मोबाइलवर तिच्या मुलाचे तब्बल ६ हजार फोटो असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. 'मी माझ्या मुलावर जिवापाड माया करीत होते. असे ती पोलिसांना वारंवार सांगत आहे. मोबाइल गॅलरी हजारो फोटॉनी भरलेली आहे. त्यात मुलाचेच फोटो जास्त आहेत. यावरुन ती आपल्या मुलावर अतीव प्रेम करत होती, हे दिसून येते. सूचना हिचे वडील पश्चिम बंगालमध्ये आहेत.