आयडीसीचे वेर्णा व व लाटंबार्से येथे मिळून आणखी ४७ भूखंड लिलांवात

By किशोर कुबल | Published: February 12, 2024 03:28 PM2024-02-12T15:28:14+5:302024-02-12T15:28:34+5:30

२८ जानेवारी रोजी या दोन्ही औद्योगिक वसाहतमध्ये मिळून ३१ भूखंड आयडीसीने लिलांवात काढले होते.

IDC auctioned 47 more plots at Verna and Latambarse together | आयडीसीचे वेर्णा व व लाटंबार्से येथे मिळून आणखी ४७ भूखंड लिलांवात

आयडीसीचे वेर्णा व व लाटंबार्से येथे मिळून आणखी ४७ भूखंड लिलांवात

पणजी : औद्योगिक विकास महामंडळाने (आयडीसी) वेर्णा व व लाटंबार्से येथे मिळून ४७ भूखंड भाडेतत्त्वावर लिलांवात काढले आहेत. २८ जानेवारी रोजी या दोन्ही औद्योगिक वसाहतमध्ये मिळून ३१ भूखंड आयडीसीने लिलांवात काढले होते. त्यानंतर आता ४७ भूखंड लिलांवात काढलेले आहेत.

वेर्णा एकूण २.५१ लाख चौरस मीटरचे २० तर लाटंबार्से येथे ३८,८५३ चौरस मीटरचे २७ भूखंड ई-लिलावाद्वारे भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत. वेर्णा येथे वीस पैकी एकूण ११,८४८ चौरस मीटरचे ४ भूखंड व्यवसायिक आस्थापनांसाठी तर १६ भूखंड उद्योग उभारण्यासाठी दिले जातील. लाटंबार्से येथे सर्व २७  भूखंड कारखाने उभारण्यासाठी भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत. ई-लिलाव एनआयसी ई-लिलाव पोर्टलद्वारे केले जातील. भूखंड हस्तांतरणासाठी पूर्वी शुल्क भरावे लागत होते. ते अलीकडेच मागे घेण्यात आले आहे.

Web Title: IDC auctioned 47 more plots at Verna and Latambarse together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा