शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM वरून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावले; म्हणाले, “पराभूत झाल्यावर आता...”
2
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस-पवार दिल्ली दौऱ्यावर, शिंदेना गृहमंत्रालय मिळणार की नाही?
3
"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखडा यांच्यावर निशाणा
4
परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड; आंदोलन पुन्हा चिघळल्याने जमावबंदीचे आदेश 
5
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
6
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी
7
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'
8
कोण आहेत सिरियाचे नवे पंतप्रधान मोहम्मद अल-बशीर? मार्च २०२५ पर्यंत पदावर राहणार, जाणून घ्या...
9
'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा ... तुमच्या व्हॉट्सॲप स्टोरेजचे टेन्शन होईल दूर!
10
परभणीत आंदोलन चिघळले, सुप्रिया सुळेंकडून निषेध व्यक्त; कठोर कारवाईची केली मागणी
11
मोठा निष्काळजीपणा! रुग्णालयात १० वर्षीय मुलाला 'O' पॉझिटिव्ह ऐवजी दिलं 'AB+' रक्त अन्...
12
Bobby Deol : "माझ्यामुळे कुटुंबाने कठीण काळ पाहिला" म्हणत बॉबी झाला भावुक; सनी देओलने पुसले अश्रू
13
२०० प्लस टार्गेट! फिफ्टी हुकली; पण Prithvi Shaw च्या भात्यातून आली 'एकदम कडक' खेळी
14
राहुल गांधींनी अचानक घेतली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट, विषय काय?
15
"बांगलादेश ऐकत नसेल तर हिंदूंच्या रक्षणासाठी...!" RSS चं मोदी सरकारला आवाहन
16
“...तर त्याचे परिणाम भोगावे लागतील”; परभणीत आंदोलन चिघळले, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
17
“‘हे’ ३ मुद्दे भाजपाला खूपच अस्वस्थ करतात, EVMबाबत सुप्रीम कोर्टात जाणार”: प्रणिती शिंदे
18
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी शिंदेंच्या शिलेदाराकडून काढली; फडणवीसांकडून नवी नियुक्ती
19
फेअरनेस क्रीमने चेहरा गोरा झाला नाही; न्यायालयाने ठोठावला १५ लाखांचा दंड, ७९ रुपयांची होती खरेदी
20
SMAT 2024, BRD vs BEN : भावाच्या कॅप्टन्सीत हार्दिकनं दाखवली गोलंदाजीतील ताकद; मग संघाला मिळालं सेमीचं तिकीट

मूळ गोमंतकीय पाक नागरिकाला भारतीय नागरिकत्व; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र बहाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2024 10:05 AM

'सीएए'चा राज्यातील दुसरा लाभार्थी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (सीएए) शेन सेबेस्त्याव परैरा या मूळ गोवेकर, परंतु पाकिस्तानी नागरिकाला भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते मंगळवारी पर्वरी येथे मंत्रालयात नागरिकत्व प्रमाणपत्र बहाल करण्याचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मुख्य सचिव व्ही. कांडावेलू व अन्य अधिकारी उपस्थित होते.

शेन सेबेस्त्याव परैरा विवाहित असून गेली ४३ वर्षे ते भारतीय नागरिकत्त्व मिळवण्यासाठी धडपडत होते. त्याचे पालक पाकिस्तानमध्ये स्थायिक होते. शेन पत्नी व तीन लहान मुलांसह डिमेलोवाडा, हणजूण येथे राहतात. वरील कायद्याखाली भारतीय नागरिकत्व प्राप्त करणारा पाकमधील ते दुसरा गोवेकर ठरले आहेत. यापूर्वी ऑगस्टमध्ये अन्य एक ख्रिस्ती पाक नागरिक, जो मूळ गोवेकर आहे, त्याला भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानमधील खिस्ती, हिंदू व शीख जे मूळ भारतीय आहेत, परंतु काही कारणामुळे त्यांना त्या देशांचे नागरिकत्व पत्करावे लागले, त्यांनी अर्ज केल्यास त्यांनाही भारतीय नागरिकत्व दिले जाईल. अनेक अर्ज सध्या विचाराधीन आहेत.

४३ वर्षे तिष्ठत होतो : शेन परेरा

दरम्यान, मनोगत व्यक्त करताना शेन परेरा यांचा चेहरा खुलला होता. पाकिस्तानमध्ये जन्मानंतर चार दशकांपूर्वी ते भारतात स्थलांतरित झाले. त्यांचे शालेय शिक्षण गोव्यात पूर्ण झाले. ते राज्यात दीर्घकाळ वास्तव्य करत आहेत. काल भारतीय नागरिकत्त्व बहाल करण्याच्या कार्यक्रमास त्यांची पत्नी व तीन लहान मुलेही उपस्थित होती. शेन परेरा यांनी सांगितले, मी गेली ४३ वर्षे भारतीय नागरिकत्वासाठी तिष्ठत होतो. आता मला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे, ही अत्यंत समाधानाची व आनंदाची गोष्ट आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत