खादी आणि ग्रामोद्योग आयोगतर्फे ग्रामीण कामगारांना टूल किट प्रदान
By समीर नाईक | Published: March 16, 2024 05:22 PM2024-03-16T17:22:28+5:302024-03-16T17:23:36+5:30
भारत सरकारतर्फे शनिवारी राज्यातील ग्रामीण कामगारांना उच्च गुणवत्ता टूल किट प्रदान केले.
समीर नाईक,पणजी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 'विकसित आणि स्वायत्त भारत' निर्मितीसाठी 'खादी ग्राम स्वराज अभियान' सक्षम करण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हायसीआय), सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकारतर्फे शनिवारी राज्यातील ग्रामीण कामगारांना उच्च गुणवत्ता टूल किट प्रदान केले.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान, दोनापावला, येथील ऑडिटोरियममध्ये सदर वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केव्हायसीआय अध्यक्ष मनोज कुमार उपस्थित होते, तर सन्मानिय पाहुणे म्हणूनकेंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. त्यांच्यासोबत डॉ. स्नेहा भागवत, डी. एस माेरजकर, डॉ. प्रदिप सरमाेकदम, व इतर मान्यवर उपस्थित होते. या दरम्यान एकूण ९० कामगारांना १८० मशीनरी आणि टूल किट प्रदान करण्यात आले.
या योजनांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि अनुसार 'खादी ग्राम स्वराज अभियान' ग्रामीण भारताला आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि सक्षम करीत आहेत. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) ने कुटीर उद्योगांच्या स्थापनेच्या क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. पीएमईजीपी साठी अर्ज करण्यापासून ते अनुदान जारी करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. पीएमईजीपी योजना सुरू झाल्यापासून देशात ९.४० लाख नवीन प्रकल्प स्थापन झाले आहेत, ज्यातून ८१.४८ लाखांहून अधिक नवीन लोकांना रोजगार मिळाला आहे. आतापर्यंत, केंद्र सरकारने या योजनांसाठी २४५२०.१९ कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान वितरित केले आहे. असे यावेळी मनोज कुमार यांनी सांगितले.
गेल्या १० वर्षात ‘न्यू इंडिया ऑफ न्यू खादी’ ने ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’ला एक नवी दिशा दिली आहे. त्यामुळे या काळात खादी उत्पादनांच्या विक्रीत चार पटीहून अधिक वाढ झाली आहे. खादीचे उत्पादन आणि विक्री वाढल्याने ग्रामीण भारतातील कारागीर आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले आहेत. यातून कारागिरांच्या मजुरीमध्ये अधिक वाढ झाल्याने कारागीर खादीच्या कामाकडे आकर्षित झाले आहेत. 'वोकल फॉर लोकल' आणि 'मेक इन इंडिया' या मंत्रामुळे खादी तरुणांमध्ये लोकप्रिय झाली आहे. गेल्या १० वर्षात खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या उलाढालीने १.३४ लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे, तर या काळात ९.५० लाखांहून अधिक नवीन लोकांना रोजगार मिळाला आहे, असेही कुमार यांनी अधिक माहिती देताना सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली खादी आणि ग्रामोद्योग आयोगांनी ग्रामीण भारताच्या कामगारांना सशक्त केले आहे. युवकांनी आणि बेरोजगारांनी खादीसह स्वताला जोडून आत्मनिर्भर बनवण्याची आणि विकसित भारत अभियानात आपले योगदान द्यावे, तसेच स्वताचा विकास करुन घ्यावा,असे आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले.