आयएमएतर्फे मेडी-वोकल नावाचे मासिक वृत्तपत्र लाँच
By समीर नाईक | Published: February 11, 2024 05:11 PM2024-02-11T17:11:31+5:302024-02-11T17:11:43+5:30
इंडियन मेडिकल असोसिएशन गोवा राज्य शाखेतर्फे (आयएमए) नुकतेच आपले मेडी-वोकल नावाचे मासिक वृत्तपत्र लाँच केले.
पणजी: इंडियन मेडिकल असोसिएशन गोवा राज्य शाखेतर्फे (आयएमए) नुकतेच आपले मेडी-वोकल नावाचे मासिक वृत्तपत्र लाँच केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश एम.एस. सोनक उपस्थित होते. त्यांच्याचहस्ते सदर मासिक लाँच करण्यात आले.
या कार्यक्रमा दरम्यान सन्मानीय पाहुणे म्हणून न्यायमूर्ती भारत पी देशपांडे, निबंधक प्रशासन, दिनेश शेट्टी, प्रधान जिल्हा न्यायाधीश दक्षिण गोवा इर्शाद आगा, प्रधान जिल्हा न्यायाधीश उत्तर, शेरीन पॉल, सदस्य सचिव, जीएसएलएसए, विजया आंब्रे, ग्लोबल हेल्थ अँड सोशल मेडिसिन विभागाचे अध्यक्ष, डॉ विक्रम पटेल, आयएमए गोवा राज्य, अध्यक्ष डॉ संदेश चोडणकर, गोवा मानसोपचार सोसायटीचे अध्यक्ष, डॉ रवींद्र अग्रवाल आणि संगथ गोवाच्या वरिष्ठ मानसशास्त्रज्ञ, उरिविता भाटिया, यांची उपस्थिती होती.
मेडी-वोकल या मासिकमुळे आरोग्य क्षेत्रातील वेळोवेळी होणाऱ्या घडामोडी कळणार आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात होणारी नवीन नवीन क्रांतीची माहिती मिळणार आहे. यातून प्रेरणा घेत अनेक रुग्णांना जगण्याची नवी आशा मिळू शकणार आहे. यातून समाजात मोठा प्रभाव पडणार आहे, असे मत न्यायाधीश सोनक यांनी यावेळी व्यक्त केले.
मेडी-वोकल या मासिक वृत्तपत्राचा उद्देश वैद्यकीय बंधुत्व आणि सामान्य जनतेला आयएमएने राज्याने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांबद्दल लोकांना माहिती देणे आहे, असे यावेळी या मासिकाच्या संपादक मेधा साळकर यांनी सांगितले.