फोंडा : गेल्या फेब्रुवारीत जुळलेल्या प्रेम प्रकरणात अवघ्या सहा-सात महिन्यांत वितुष्ट येऊन प्रेयसीने प्रियकरावर चाकूहल्ला केला. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कोडार-निरंकाल येथे ही घटना घडली. गंभीर प्रियकरास रुग्णालयात दाखल केले आहे. सरिता रमाकांत गावकर (वय २१, रा. शिंगणेव्हाळ-निरंकाल) असे प्रेयसीचे, तर धोंडू रमेश कुडव (वय २५, रा. कुठ्ठाळी, मूळ-पेडणे) असे प्रियकराचे नाव आहे. पाठीत सुरा खुपसलेल्या अवस्थेत रक्तबंबाळ धोंडू याने कोडार येथून सहा-सात किलोमीटरवरील फोंडा पोलीस स्थानक गाठून हल्ल्याची माहिती दिली. (पान २ वर)
प्रेयसीच्या चाकूहल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी
By admin | Published: September 13, 2014 1:27 AM