लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नोकरीकांडाचे गांभीर्य वाढल्याने राज्यातील अनेक राजकारणी बरेच गडबडले आहेत. विशेषतः आमदार गणेश गावकर यांच्या कथित आवाजातील ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर सर्व प्रमुख पक्षांतील आमदारांनी कार्यकर्त्यांशी मोबाईलवर बोलणे (रेग्युलर कॉल्स पद्धत) बंद करून संवादासाठी व्हॉट्सअॅप कॉलिंगवर भर दिला आहे. संवादाचे रेकॉर्डिंग होऊ नये म्हणून बहुतेक आमदार कालपासून अधिक सतर्क बनले. नोकरी प्रक्रियेत किती प्रमाणात आमदार, मंत्र्यांचा सहभाग असतो, हे सर्वांना ठाऊक आहे.
दरम्यान, सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीच्या तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे. संशयित पूजा नाईक, दीपश्री गावस यांच्याविरोधात गुरुवारी पणजी पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले. तर मडगाव व वास्कोत नौदलात भरतीच्या आमिषाने फसवणूकप्रकरणी संशयितांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
दीपश्रीविरोधातही तक्रार: नोकरीसाठी पैसे घेतल्या प्रकरणात अटकेत ठगसेन दिपश्री सावंत उर्फ महतो उर्फ गावस हिच्या विरोधातही पणजी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. लेखा खात्यात अकाऊंटटची नोकरी देण्याचे आमिष दाखवून पणजीतील एका व्यक्तीला दिपश्रीने १० लाख रुपयांचा गंडा घातला आहे.
मडगावात दोन महिलांना अटक
सरकारी नोकरीसाठी पैसे घेऊन फसवणूक केल्या प्रकरणात गुरुवारी आणखी एकाची भर पडली. कारवार येथील 'सी बर्ड' नौदलात नोकरी देण्याच्या बहाण्याने मडगाव येथील एका युवकाची १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मडगाव पोलिसांनी दोन महिलांना अटक केली. विश्या गावडे (नेसाय) आणि सोनिया आचारी (कारवार) अशी त्यांची नावे आहेत. मडगाव पोलिसांनी सांगितले की,
पूजा नाईकविरोधात पणजीत गुन्हा
सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पूजा नाईकविरोधात पणजी पोलिसांत गुरुवारी गुन्हा नोंद करण्यात आला. कालापूर (पणजी) येथील सुषमा सदाशिव नाईक यांनी याबाबत तक्रार दिली. सरकारी खात्यात मोठ्या पदावर नोकरीचे आमिष दाखवून संशयित पूजा नाईकने ६ लाख रुपये घेतले. नोकरी न मिळाऱ्यास पैसे परत देऊ असे तिने सांगितले होते. परंतु तिने पैसे परत दिले नाहीत. पैसे मिळावेत यासाठी वारंवार संपर्क साधला. दरवेळी तिने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आले असे नाईक यांनी तक्रारीत म्हटले आहे.