खनिज वाहतूकदार गीतेश नाईक गजाआड
By admin | Published: July 14, 2017 02:23 AM2017-07-14T02:23:42+5:302017-07-14T02:26:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : बेकायदा खाण प्रकरणात गीतेश नाईक या वाहतूकदाराला एसआयटीने अटक केली. जितेंद्र देशप्रभू यांच्या भाईडवाडा-कोरगाव येथील
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : बेकायदा खाण प्रकरणात गीतेश नाईक या वाहतूकदाराला एसआयटीने अटक केली. जितेंद्र देशप्रभू यांच्या भाईडवाडा-कोरगाव येथील खाणीवरून बेकायदेशीरपणे खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक केल्याचा ठपका त्याच्यावर आहे. देशप्रभू यांच्यावर या प्रकरणात याअगोदरच गुन्हा दाखल झाला आहे.
खाण घोटाळा प्रकरणातील अटकसत्र सुरूच असून कांचा गवंडर व फिलीप
जॅकोब यांच्यानंतर आता ढवळी-फोंडा येथील गीतेश नाईक याला एसआयटीने अटक केली. भाईडवाडा-कोरगाव येथील
जितेंद्र देशप्रभू यांच्या बेकायदेशीर खाणीच्या प्रकरणातील चौकशीदरम्यान
ज्या साक्षीदारांकडून साक्षी देण्यात
आल्या, त्यात गीतेश नाईक याचा
सहभाग आढळून आला होता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आल्याची माहिती एसआयटीच्या सूत्रांनी दिली.
देशप्रभू व गीतेश नाईक या दोघांनी मिळून बेकायदेशीर खनिजाचे उत्खनन
आणि नंतर वाहतूक केल्याचे चौकशीत आढळले आहे. सरकारचा ५० कोटी रुपये महसूल बुडविल्याचा त्यांच्यावर ठपका
आहे. या प्रकरणात काशिनाथ शेट्ये
यांनी केलेल्या तक्रारीनंतर देशप्रभू यांना अटकही करण्यात आली होती. त्यावेळी गीतेश यालाही अटक झाली होती. नंतर खाण खात्याने तक्रार केल्यानंतर एसआयटीने गुन्हा नोंदविला होता.
गीतेश नाईक तपासाला सहकार्य करत नाही. त्यामुळे त्याची कोठडीतील चौकशी अनिवार्य असल्याचा दावा करून एसआयटीने गुरुवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याला अटक केली. शुक्रवारी त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.