खाण घोटाळा प्रकरण : ‘टॅली’ इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच नोंदवल्या, हरिश मेलवानीचे एसआयटीला उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 12:38 PM2018-09-12T12:38:47+5:302018-09-12T12:39:10+5:30
खाण घोटाळा प्रकरणाचा तपास करणा-या एसआयटीला खनिज उत्तखनन आणि, खनिज डंप आणि खनीज ग्रेडिंग याविषयी काहीच ज्ञान नसल्यामुळे आपल्यावर विनाकारण ठपके ठेवत असल्याचे नथुरमल खाण कंपनीचे मालक हरीश मेलवानी यांनी म्हटले आहे.
पणजी : खाण घोटाळा प्रकरणाचा तपास करणा-या एसआयटीला खनिज उत्तखनन आणि, खनिज डंप आणि खनीज ग्रेडिंग याविषयी काहीच ज्ञान नसल्यामुळे आपल्यावर विनाकारण ठपके ठेवत असल्याचे नथुरमल खाण कंपनीचे मालक हरीश मेलवानी यांनी म्हटले आहे. त्यांच्या कार्यालयाची मंगळवारी एसआयटीने झडती घेतली होती. खनिज मालाच्या व्यवहारातील नोंदी आपल्या कंपनीत ‘टॅली’ सॉफ्टवेअरद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच नोंदविल्या जातात. त्यामुळे अटाऊंट वही (लेजर) बाळगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एसआयटीला हवी असेल तर त्यांना टेली पाठविली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
माझे खाणलीज हे पोर्तुगीज कायद्याअंतर्गत मंजूर झाले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर न्यायालयीन प्रक्रियेनेच माझ्या नावावर करण्यात आले होते. हस्तांतर प्रक्रियेला एसआयटीकडून घेण्यात आलेला आक्षेप त्यामुळे निरर्थक ठरतो आहे‘ असे त्यांनी सांगितले. दरम्यान नथूरमल खाण कंपनीच्या पणजी येथील कार्यालयातील झडतीनंतरही ही एसआयटीला हवी असलेले अकाउंट वही मिळाली नसल्यामुळे एसआयटीकडून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्याची शक्यता आहे. मेलवानी यांनी जितक्या किंमतीच्या खनिज मालाचे उत्खनन केले होते त्यापेक्षाही अधिक रॉयल्टी फेडल्यामुळे बेकायदेशीर खनिज त्यांनी विकले असावे असा एसआयटीला संशय आहे. काणर उत्खनन आणि रॉयल्टी यांचा ताळमेळ बसत नसल्याचा त्यांचा दावा आहे.