नारायण गावस -पणजी: गेली अनेक वर्षे लाेकसभेत खासदार म्हणून राज्याचे प्रतिनिधित्व करणारे केंदीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी आतापर्यंत किती गोमंतकीय युवकांना केंद्र सरकारच्या नाेकऱ्या दिल्या हे लेखी सांगावे. मंत्री श्रीपाद नाईक यांनी लाेकसभेत गोव्यातील बेराेजगारी विषयी काहीच समस्या मांडल्या नाही असा आरोप आरजीचे अध्यक्ष तसेच उत्तर गोव्याचे लोकसभेचे उमेदवार मनाेज परब यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्या सोबत आरजीचे अजय खोलकर उपस्थित होते.मनोज परब म्हणाले, श्रीपाद नाईक हे राज्य संरक्षण मंत्री असताना त्यांनी गोवा शिपयार्डमध्ये किती गोमंतकीयांना नोकऱ्या दिल्या. त्यांनी जून २०२२ मध्ये एका व्हिडीओमध्ये गाेवा शिपयार्ड, पाेस्ट कार्यालय तसेच अन्य केंद्रशासित कार्यालये, उद्याेगांना गोमंतकीय युवकांना नोकऱ्या द्या असे आवाहन केले होते. तरीही तोच प्रकार सुरु आहे. गोवा शिपयार्डमध्ये माेठ्या प्रमाणात बाहेरील लोकांना नाेकऱ्या दिल्या जात आहेत.
श्रीपाद नाईक़ हे अनेक वर्षे राज्य मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गाेवा शिपयार्ड, गोवा पाेस्ट कार्यालय तसेच आयुष हॉस्पिटलमध्ये किती स्थानिकांना नोकऱ्या दिल्या हे लेखी जाहीर करावे. असे आवाहन मनोज परब यांनी केेले आहे. श्रीपाद नाईक यांनी एवढी वर्षे खासदार राहून लाेकांसाठी काहीच केले नाही. लाेकसभेत गोव्यातील बेराेजगारांविषयी एकसुद्धा प्रश्न मांडले