देहदानाची प्रेरणास्रोत मुकली देहदानास...
By admin | Published: May 24, 2015 01:19 AM2015-05-24T01:19:43+5:302015-05-24T01:20:00+5:30
जुन्या पिढीतील असूनही क्रांतिकारी विचाराने भारलेल्या ७८ वर्षे वयाच्या महिलेने मृत्यूनंतर
वासुदेव पागी ल्ल पणजी
जुन्या पिढीतील असूनही क्रांतिकारी विचाराने भारलेल्या ७८ वर्षे
वयाच्या महिलेने मृत्यूनंतर
देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. गुरुवारी त्यांचे निधन झाल्यानंतर मृतदेह गोमेकॉच्या स्वाधीनही
केला; परंतु तांत्रिक मुद्द्यावरून गोमेकॉस मृतदेह नातेवाईकांना
परत करावा लागला.
या महिलेचे नाव सविता
खटखटे असे आहे. त्या अंधेरी-मुंबई येथील आहेत. त्या सार्वजनिक क्षेत्रातही होत्या. विशेषत: देहदान चळवळीत त्यांनी झोकून दिले होते. त्यांनी देहदानाचे इच्छापत्र दिले होतेच, शिवाय अनेकाना देहदानासाठी प्रेरितही केले होते.
राष्ट्र सेवा दलाच्या त्या कार्यकर्त्याही होत्या.
खटखटे वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथे आल्या असता शुक्रवारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. म्हापसा येथील एका खासगी इस्पितळात त्यांना दाखल केले;
परंतु उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांचे निधन झाले.
खटखटे यांच्या इच्छेनुसार देहदानासाठी त्यांचा मृतदेह गोमेकॉत आणला गेला. त्या ठिकाणी गोमेकॉकडून काही सोपस्कार
करून मृतदेह गोमेकॉच्या ताब्यातही घेण्यात आला; परंतु सविता यांचे
पुत्र आश्विन खटखटे यांना अपेक्षा
भंग करणारी माहिती गोमेकॉकडून देण्यात आली. तांत्रिक कारणामुळे त्यांच्या आईचा मृतदेह ते स्वीकारू शकत नाहीत, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांना हॅपिटायटीस बी इन्फेक्शन होते. त्यामुळेच त्यांचे निधन झाले होते. हॅपिटायटीस बी इन्फेक्शन असलेला मृतदेह अॅनॉटमी विभागात ठेवला जात नाही.
शरीरशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाही ते इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, असा गॉमेकॉचा दावा आहे. मृतदेह तूर्त गोमेकॉच्या शवागारात ठेवला आहे. नातेवाईकांना तो ताब्यात घेण्यास सांगितले आहे.
देहदानासाठी अनेकजण पुढे येउ लागले आहेत. परंतु ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी गोमेकॉतून प्रयत्न होणे गरजेचे आहे.