ड्रग्स, मद्य आदी नशेबाबत देशभरातील संवेदनशील २७२ जिल्ह्यांमध्ये उत्तर गोवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 09:19 PM2020-08-16T21:19:49+5:302020-08-16T21:20:11+5:30
ड्रग्स, मद्य आणि अन्य प्रकारचे नशापाणी याबाबत उत्तर गोवा देशभरातील २७२ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये आला आहे.
पणजी - ड्रग्स, मद्य आणि अन्य प्रकारचे नशापाणी याबाबत उत्तर गोवा देशभरातील २७२ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्रीमती आर. मेनका यांच्या हस्ते शनिवारी नशामुक्त भारत मोहिमेचे या जिल्हयात इ अनावरण करण्यात आले. समाजातील नशा करणाऱ्या प्रत्येक घटकांपर्यंत पोचून नशा निर्मूलन करण्याचा हेतू आहे.
याप्रसंगी बोलताना श्रीमती मेनका म्हणाल्या की, युवकांमध्ये ड्रग्स, मद्यपान आणि नशेचे प्रमाण जास्त आहे. गृह खाते, आरोग्य खाते, शिक्षण खाते तसेच प्रसार माध्यमे नशामुक्तीसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम सुचविले आहेत. व्यसनाधीन व्यक्ती तसेच त्याच्या झळग्रस्त कुटुंबियांना उत्तर जिल्हा इस्पितळातील व्यसनमुक्ती कें द्रात आवश्यक ती मदत केली जाईल.
जागृतीसाठी श्रीमती मेनका यांच्या नेतृत्त्वाखालील या समितीवर पोलिस उपाधिक्षक, जिल्हा न्यायिक सेवा प्राधीकरणाचा प्रतिनिधी, जिल्हा न्यायालय प्रतिनिधी, जिल्हा वैद्यकीय अधिक्षक, आॅझिलो इस्पितळ, उच्च शिक्षण अधिकारी, महिला तथा बाल कल्याण अधिकारी, कृपा फाउंडेशन, निवृत्त अबकारी उपायुक्त सत्यवान भिवशेट, निवृत्त पोलिस अधिक्षक ओमप्रकाश कुडतरकर आदींचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी रात्री वागातोर किनाºयावर रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड घालून २३ जणांना अटक करुन ९ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. यावरुन राज्याच्या किनारी भागांमध्ये आजही राजरोसपणे नशा केली जाते हे उघड झाले आहे.