परीक्षा पे चर्चा अंतर्गत PM मोदी विद्यार्थ्यांना संबोधणार; शिक्षण खात्यातर्फे खास सूचना जारी
By समीर नाईक | Published: January 25, 2024 03:59 PM2024-01-25T15:59:23+5:302024-01-25T16:00:10+5:30
भावी राष्ट्रनिर्मात्यांना शिक्षणाचा आनंद देण्यासाठी आणि परीक्षेची भीती आणि चिंता कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित केला आहे.
समीर नाईक, पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २९ जानेवारी रोजी शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसोबत,भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे सकाळी ११ वाजता परीक्षा पे चर्चा करणार आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सोमवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दूरदर्शन, डीडी नॅशनल, डीडी न्यूज आणि डीडी इंडियाद्वारे केले जाईल. तसेच (ऑल इंडिया रेडिओ मीडियम वेव्ह, ऑल इंडिया रेडिओ एफएम चॅनल), पीएमओ, शिक्षण मंत्रालय, MyGov.in आणि शिक्षण मंत्रालयाचे युट्यब चॅनेल, फेसबुक लाईव्ह आणि स्वयंप्रभा यांच्या वेबसाइटचे देखील उपलब्ध असेल.
राज्यभरातील देखील जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना पंतप्रधानांच्या प्रोत्साहनपर शब्दांचा लाभ मिळावा यासाठी राज्य शिक्षण खात्याने पावले उचलली आहे. शिक्षण खात्याने परिपत्रक काढून राज्यातील सर्व शाळांना महत्वाच्या सूचना सूचना केल्या आहेत.
काही ठळक सूचना खालीलप्रमाणे
- शाळेत आवश्यक व्यवस्था करणे आवश्यक आहे जेणेकरून इयत्ता नववी आणि त्यावरील सर्व विद्यार्थी दूरदर्शन,प्रोजेक्शन स्क्रीन,रेडिओ इत्यादीद्वारे प्रसारण पाहू/ऐकू शकतील.
- कार्यक्रमाची माहिती स्कूल वेबसाइट, सोशल मीडिया ग्रुप इत्यादींद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारित केली जाऊ शकते.
- जगृतीसाठी संबंधित पोस्टर किंवा बॅनर शाळेच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात यावे.
- लोकप्रतिनिधी जसे की, संसद सदस्य, विधानसभेचे सदस्य, पंच सदस्य, प्रतिष्ठित व्यक्ती, सेवानिवृत्त अधिकारी आणि पालक यांना विद्यार्थ्यांसह थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी शाळेत आमंत्रित केले जावे.
- कार्यक्रम झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थी,शिक्षक, पालकांचे तपशील ज्यांनी प्रसारण पाहिले/ऐकले आहे अशा दोन सर्वोत्कृष्ट छायाचित्रांसह एससीइआरटी-Goa कडे https://forms.gle/EcBOAgqyCEHWTpV47 या नमूद केलेल्या गुगल फॉर्मद्वारे २९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ पर्यंत सबमिट करावे.
भावी राष्ट्रनिर्मात्यांना शिक्षणाचा आनंद देण्यासाठी आणि परीक्षेची भीती आणि चिंता कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित केला आहे.