सिद्धांत शिरोडकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर
By वासुदेव.पागी | Published: January 25, 2024 03:58 PM2024-01-25T15:58:36+5:302024-01-25T15:59:10+5:30
शुक्रवारी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात शिरोडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पणजी : वाहतूक पोलीस विभागाचे उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांना यंदा उतिकृष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती सेवा पदक जाहीर झाले आहे. तसेच एमटी विभागाचे पोलीस उपअधीक्षक विल्सन डिसोझा आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षक विभागाचे पोलीस उपअधीक्षक तुषार वेर्णेकर यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात शिरोडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
देशभरात एकूण १,१३२ पोलीस, अग्निशमन दल, गृहरक्षक आणि नागरी सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रपती पदक १०२ जणांना तर ७५३ जणांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.
राष्ट्रपती पदकासाठी प्रत्येक राज्यातून अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली जाते. गोव्यातूनही ती केली जाते. गोव्यातून पोलीस आणि अग्नीशमन दळातील जवानांच्या नावाची यादी राष्ट्रपती पदकासाठी शिफारस नित्य नियमाने केली जाते, परंतु गृहरक्षक दलाच्या जवानांची म्हणजेच होमगार्डची मात्र फार कमी वेळा शिफारस केली जात आहे. त्यामुळे गेव्यातील होमगार्डना क्वचित वेळा राष्ट्रपती पदके जाहीर होतात.