पुढील दोन दिवस राज्यात गडगडाटसह पावसाची हजेरी; हवामान विभागाचा अंदाज

By समीर नाईक | Published: May 16, 2024 04:25 PM2024-05-16T16:25:12+5:302024-05-16T16:25:56+5:30

सध्या राज्यात कोरडे हवामान असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

rainfall and thunderstorms for the next two days in goa says meteorological department | पुढील दोन दिवस राज्यात गडगडाटसह पावसाची हजेरी; हवामान विभागाचा अंदाज

पुढील दोन दिवस राज्यात गडगडाटसह पावसाची हजेरी; हवामान विभागाचा अंदाज

समीर नाईक, पणजी: राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून पुढील २ तासांनी डिचोलीच्या सीमावर्ती भागात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि वार्‍यासह गडगडाट होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात कोरडे हवामान असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पणजी गुरुवार १६ रोजी येथे सर्वाधिक ३५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तरे दाबोळी येथे २६.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. 

पुढील दोन दिवस १७ आणि १८ मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ३०-४० किमी ताशी वेगाने वाहणारे वारे वेगळ्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. तर १९ आणि २० रोजी हवामानाचा कोणताही इशारा अद्याप तरी देण्यात आला नाही.

Web Title: rainfall and thunderstorms for the next two days in goa says meteorological department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.