सार्दिनना पुन्हा तिकीट; माझा पाठिंबा नसेल! विजय सरदेसाई यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2024 03:02 PM2024-02-21T15:02:38+5:302024-02-21T15:03:26+5:30

काँग्रेस पक्षाने दक्षिणेसाठी नवा उमेदवार द्यावा

re ticket to sardines i will not support said vijai sardesai | सार्दिनना पुन्हा तिकीट; माझा पाठिंबा नसेल! विजय सरदेसाई यांचा इशारा

सार्दिनना पुन्हा तिकीट; माझा पाठिंबा नसेल! विजय सरदेसाई यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कॉंग्रेसने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात पुन्हा फ्रान्सिस सार्दिन यांना तिकीट दिल्यास मी पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट विधान गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सरदेसाई म्हणाले की, सार्दिन यांनी फातोर्डा मतदारसंघात काडीचेही काम केलेले नाही. मी या मतदारसंघाचा आमदार असूनही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी कधीच माझी किंमत केली नाही. अशा व्यक्तीला जर पुन्हा काँग्रेस तिकीट देत असेल तर मी वेगळा विचार करीन.

'इंडिया' युतीसाठी काँग्रेस आणि आम आदमी यांच्यात चर्चा चालू असल्याचे जे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद त्यांनी केले आहे, त्याबद्दल विचारले असता तर सरदेसाई म्हणाले की, या घडामोडीत मी पक्षकार नाही. त्यामुळे मी कोणतेही भाष्य करू इच्छित नाही. 

भाजप संघटनात्मकदृष्ट्या मजबूत आहे, हे वास्तव मान्य करायलाच हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा दाखवून भाजप पुन्हा निवडणुकीस सामोरे जात आहे. पक्षाचा उमेदवार कोणीही असो मोदींच्या नावावर जी निवडणूक लढवली जाणार आहे. विरोधकांशी टक्कर द्यायची असेल तर असा चेहरा उभा करावा लागेल, जो 'गॉय, गोंयकार आणि गोंयकारपण' याच्याशी एकनिष्ठ असावा. परंतु दुर्दैवाने हे अजून झालेले नाही. विरोधकांनी एकत्र येण्याच्या बाबतीत 'इंडिया' युतीचीही गोव्यात काहीच प्रगती झालेली नाही, असेही सरदेसाई म्हणाले.

मते खाण्यासाठी मी उमेदवार देणार नाही!

सध्या तरी माझी भूमिका 'वेट अँड वॉच' आहे. पर्यायी उमेदवार चांगला असेल तर विचार करता येईल. एक मात्र खरे की गोवा फॉरवर्ड लोकसभा निवडणुकीत उतरणार नाही. कारण, प्रादेशिक पक्षाने लोकसभेची निवडणूक लढवणे तेवढे सोपे नसते आणि तेवढा पैसा माझ्याकडे नाही. निवडणूक लढवण्यासाठी कोणाकडे पैशांसाठी हात पसरण्याची माझी वृत्ती नाहीं. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे गोवा फॉरवर्ड रिंगणात उतरवून मला विरोधकांची मते फोडायची नाहीत. दुसऱ्यांची मते खाण्यासाठी मी उमेदवार उभा करणार नाही.

 

Web Title: re ticket to sardines i will not support said vijai sardesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.