रोहन खंवटे यांचा पोलिसांवर निशाणा!; पर्यटकांची सतावणूक न करण्याचा मंत्र्यांकडून सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 08:46 AM2023-10-24T08:46:33+5:302023-10-24T08:48:40+5:30

पर्यटकांची सतावणूक वाढल्यास याच हंगामात पर्यटन व्यवसायाला झळ बसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

rohan khanwate targets goa police advice from ministers not to harass tourists | रोहन खंवटे यांचा पोलिसांवर निशाणा!; पर्यटकांची सतावणूक न करण्याचा मंत्र्यांकडून सल्ला

रोहन खंवटे यांचा पोलिसांवर निशाणा!; पर्यटकांची सतावणूक न करण्याचा मंत्र्यांकडून सल्ला

पणजी : पोलिसांकडून पर्यटकांचा छळ होत असल्याने पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पुन्हा उद्विग्नता व्यक्त करत पोलिसांनी पर्यटनाला चांगल्या त्याच गोष्टी करण्याची सूचना केली आहे. पर्यटकांची सतावणूक वाढल्यास याच हंगामात पर्यटन व्यवसायाला झळ बसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

गोवा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये काल आयोजित 'स्टार्टअप अॅण्ड कॉर्पोरेट ब्रीड' कार्यक्रमानंतर ते बोलत होते. कार्यक्रमास जीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो आदी उपस्थित होते.

पोलिस पर्यटकांची वाहने अडवतात, त्यावरून खंवटे यांनी नाराजी व्यक्त केली होती. आमदार मायकल लोबो पर्यटन क्षेत्रातील बेकायदा कृत्यांवर आता बोलत आहेत. मी दीड वर्ष याच बेकायदेशीरपणाबद्दल बोलत असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक किनाऱ्यावर शॅक थाटण्याच्या क्षमतेचा अहवाल मला मिळाला आहे. किती शेंक द्यायचे हे निश्चित झालेले आहे. पर्यावरण नियमानुसारच शॅक दिले जातील. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनापूर्वी पुढील ६ जून आधी आध्यात्मिक पर्यटन सर्किट पूर्ण केले जाईल, असेही खंवटे यांनी सांगितले.

राज्यातील पर्यटन हंगाम वाढत आहे. पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल होत आहेत. परंतु, पर्यटनाच्या नावाखाली दलाली करत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. पर्यटकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे. पोलिसांनी देखील कारवाई करताना पर्यटकांच्या मनात गोव्याबद्दल नकरात्मकता निर्माण होईल, असे वागू नये. - रोहन खंवटे, पर्यटनमंत्री


 

Web Title: rohan khanwate targets goa police advice from ministers not to harass tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा