सनातनचा आश्रम हटवा!
By admin | Published: October 1, 2015 01:36 AM2015-10-01T01:36:14+5:302015-10-01T01:36:26+5:30
फोंडा : काही वर्षांपूर्वी मडगावातील बॉम्बस्फोट आणि आता कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पानसरे हत्या
फोंडा : काही वर्षांपूर्वी मडगावातील बॉम्बस्फोट आणि आता कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पानसरे हत्या प्रकरणात सनातनचा साधक समीर गायकवाड याला अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे गोव्यातील रामनाथी-बांदोडा येथील सनातन संस्थेचा आश्रम या भागातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला असून सरकारने येत्या ७ दिवसांत रामनाथी येथून सनातन आश्रम हटवावा; अन्यथा या आश्रमाविरोधात रामनाथ युवा संघातर्फे फोंड्यात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा संघाचे अध्यक्ष सौरभ लोटलीकर यांनी बुधवारी रामनाथी येथे पत्रकार परिषदेत दिला.
या पत्रकार परिषदेस त्यांच्यासोबत बांदोडा पंचायतीच्या पंच सदस्य शर्मिला लोटलीकर तसेच दिनेश रामनाथकर, तुळशीदास नाईक व सिद्धार्थ रामनाथकर उपस्थित होते.
सौरभ लोटलीकर म्हणाले की, गोव्यात कोणतीही गैरकृती न करताही सरकारने श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिक यांच्यावर प्रवेशबंदी लागू केली आहे. मात्र, रामनाथी येथील सनातन संस्थेविरुद्ध स्थानिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही आश्रमावर कोणतीही कारवाई केली जात नाही. सनातन आश्रमाला स्थानिक आमदारांचा पाठिंबा असून त्यांच्याच आशीर्वादामुळे ही संस्था रामनाथीत कार्यरत असल्याचा दावा लोटलीकर यांनी केला.
गेल्या काही वर्षांत सनातन संस्थेविरुद्ध स्थानिकांनी अनेक वेळा पोलीस तक्रारी दाखल केल्या. मात्र, त्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. सनातन संस्थेविरुद्ध आवाज उठविणाऱ्या अनेकांविरुद्ध पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश तक्रारी खोट्या आहेत. स्थानिकांचा आवाज दाबण्यासाठी त्या करण्यात आलेल्या आहेत. सनातन आश्रम रामनाथीतून हटविण्यात यावा, (पान २ वर)