पणजी : भाजप सरकार हे स्थानिकांविरुद्ध आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे. सावंतवाडीतील भारतीय जनता युवा मोर्चाने आयोजित केलेल्या राेजगार मेळाव्यात गाेव्यातील ३० उद्योजकांनी सहभाग घेतला. या घटनेचा आम्ही विरोध करतो. सरकारने यात सहभागी झालेल्या ३० उद्योगांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवावी, अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
‘गोव्यात स्थानिक बेरोजगार असतानाही परप्रांतीयांना रोजगार देणे चुकीचे आहे. आम्ही अनेक वेळा बेराेजगारांचा मुद्धा उठवत असतो. गाेव्यात अनेक कंपन्या आहेत. औद्योगिक वसाहती आहेत. पण बिराेजगारांना रोजगार दिला जात नाही. या कंपन्यांमध्ये माेठ्या प्रमाणात परप्रांतीय लाेक आहेत. आता पुन्हा हा राेजगार मेळावा सावंतवाडीत होऊन यात गोमंतकीय स्थानिक युवकांना वगळले जात आहे, असा अराेप मनोज परब यांनी केला.
हा बेरोजगारांवर अन्याय
सावंतवाडीतील भाजयुमो आपल्या राज्यात रोजगार मिळावा भरविले याला आमचा विरोध नाही. पण गोव्यात मोठ्या प्रमाणात बेराेजगारी असतानाही या मेळाव्यात राज्यातील ३० कंपन्या सहभागी झाल्या होत्या. याला आमचा विरोध आहे. राज्यात बी.फॉर्म, डी.फॉर्म, आयटीआय, डिप्लोमा, ऑटोमोबाईल अभियंते असे शिक्षण घेतलेले बेराेजगार आहेत पण अशा विविध जागांसाठी सावंतवाडीतील रोजगार मेळाव्यात ही जाहीरात या कंपन्यांनी दिली. गोव्यातील युवकांना संधी देण्याऐवजी महाराष्ट्रातील युवकांना संधी दिली आहे. हा स्थानिक युवकांवर अन्याय आहे, असेही मनोज परब यांनी म्हटले.
गोमंतकीयांना सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे आता खासगी नोकऱ्याही हे सरकार बाहेरील लोकांना देत आहेत. सावंतवाडी येथे मेळाव्यात भरती झालेल्या कंपन्या गोव्यातील साधनसुविधा वापरत आहेत. असे असताना त्यांनी गोवेकरांनाच नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देणे गरजेचे आहे. याआधी राज्य सरकारने राज्यातच रोजगार मेळावा घेतला होता. त्यामध्ये किती जणांना नोकऱ्या मिळाल्या, किती जणांना केवळ ऑफर लेटर दिले, पगार किती दिला, किती जणांना काढून टाकले याची माहिती सरकारने द्यावी, असेही मनोज परब यांनी म्हटले आहे.