वासुदेव पागी, पणजी: सामाजिक कार्यकर्ते अँड आयरिश रॉड्रीगीश यांना माजी मंत्री विनोद पालयेकर यांच्या बदनामी प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा ठोठावणारा म्हापसा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायलयाचा (जेएमएफसीचा) निवाडा उत्तर गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी रद्दबातल ठरविला आहे.
म्हापसा न्यायालयाच्या तत्कालीन न्यायाधीश पूजा देसाई यांनी गेल्या वर्षी ५ जानेवारी रोजी ॲड. रॉड्रीगीश यांना जोशी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर या निवाड्याला सत्र न्यायालयात आव्हान देऊन रॉड्रीगीश यांनी म्हापसा न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळवली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी त्यांच्या 19 पानांच्या निकालात जेएमएफसीचा आदेश बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. तसेच या आदेशात अनेक त्रुटी राहिल्या आहेत असेही नमूद करण्यात आले आहे. तसेच अनेक तांत्रिक बाजूवर ही या देशात टिपण्णी करण्यात आली आहे.
दरम्यान या निवाड्यामुळे आयरीश रॉड्रीगीश यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. माझी जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांची बदनामी केल्याचा गुन्हा त्याच्याविरुद्ध नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात वेगाने तपास करून क्राईम ब्रँचने आरोप पत्र ही दाखल केले होते. जेएमएससीतील पहिल्या लढाईत आयरीश रॉड्रीगीश यांच्या विरुद्ध निवाडा केला होता. मात्र सत्र न्यायालयाने हा निवाडा रद्दबातल ठरविला.