दहावीचा निकाल ८५.१५ टक्के
By admin | Published: May 24, 2015 01:18 AM2015-05-24T01:18:21+5:302015-05-24T01:18:32+5:30
पणजी : शालान्त मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ८५.१५ टक्के लागला असून यशाची परंपरा कायम राखताना मुलींनी उत्तीर्ण टक्केवारीत
पणजी : शालान्त मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ८५.१५ टक्के लागला असून यशाची परंपरा कायम राखताना मुलींनी उत्तीर्ण टक्केवारीत आणि सर्वाधिक गुण घेण्याच्या बाबतीत मुलांवर मात केली. एकूण ७६ विद्यालयांचा ९५ ते १०० टक्के निकाल लागला असून अशी कामगिरी ३७ विद्यालयांनी सलग दोन वर्षे केली आहेत.
एकूण १९५८२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १६७७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८४.३० इतकी आहे, ८९.१५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. एकूण २४ केंद्रांत परीक्षा झाली होती. त्यात सर्वाधिक निकाल म्हापसा केंद्रात ९०.८३ टक्के, तर सर्वांत कमी निकाल ७२.६० टक्के लागला.
क्रीडा गुणांचा लाभ यंदा ७६२१ विद्यार्थ्यांना झाला. त्यातील ५०७ विद्यार्थी केवळ क्रीडा गुणांमुळे उत्तीर्ण होऊ
शकले. म्हणजेच २.५९ टक्के विद्यार्थी क्रीडागुणांमुळे उत्तीर्ण झाले.
काही कठीण वाटणारे विषय सोडून त्याऐवजी पूर्व व्यावसायिक विभागातील सोपे विषय घेऊन परीक्षा देण्याची
सुविधा शालान्त मंडळाने दिली आहे.
अशा एकूण २८० विद्यार्थ्यांपैकी २२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विशेष मुलांच्या गटात १९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील ५२ जण
विशेष शाळेतील, तर १४७ जण
नियमित विद्यालयातील होते. एकूण ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. (प्रतिनिधी)